Veeresh Borkar RGP Office Dispute: आरजीपी कार्यालयात अनधिकृत प्रवेशास बंदी! आमदार वीरेश बोरकरांचे नियंत्रण; खोलकर यांच्या गटाने नोंदविला आक्षेप

RGP Party Office Access Restrictions: मनोज परब यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्‍यास घेत असल्‍याचेही जाहीर केले.
RGP Party Office Access Restrictions
Veeresh Borkar RGP Office DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचे (आरजीपी) राष्‍ट्रीय अध्‍यक्ष असल्‍याचा दावा करीत आमदार वीरेश बोरकर यांनी काहीच दिवसांपूर्वी पक्षाच्‍या सर्व समित्‍या बरखास्‍त करण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर आता पक्षाच्‍या कार्यालयातील अधिकृत कागदपत्रे, सदस्यत्व नोंदवह्या, आर्थिक नोंदी, डिजिटल डेटा, गोपनीय फाईल्स आणि इतर मालमत्ता सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करण्‍यावर निर्बंध घातले.

तशी नोटीसही त्‍यांनी पाटो-पणजी येथील पक्षाच्‍या मुख्‍यालयाच्‍या दारावर लावली. परंतु, खोलकर गटाने याला तीव्र विरोध दर्शविला असून, रविवारी सायंकाळी मुख्‍यालयाबाहेर जाऊन त्‍यांनी या प्रकरणाबाबत सोमवारपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी स्‍थापन झालेल्‍या आणि पहिल्‍याच विधानसभा निवडणुकीत बोरकर यांच्‍या रूपाने एक आमदार निवडून आणलेल्‍या ‘आरजीपी’तील वाद काही महिन्‍यांपूर्वी टोकाला गेला.

RGP Party Office Access Restrictions
Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

त्‍यातून मनोज परब यांनी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्‍यास घेत असल्‍याचेही जाहीर केले. तेव्‍हापासून मौनव्रत धारण केलेल्‍या आमदार बोरकर यांनी गेल्‍या काही दिवसांपासून पक्ष ताब्‍यात घेण्‍यासाठीची खेळी सुरू केली आहे. त्‍याचा पहिला भाग म्‍हणून स्‍वत:ला ‘आरजीपी’चा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष म्‍हणून घोषित करून त्‍यांनी पक्षाच्‍या सर्व समित्‍या बरखास्‍त केल्‍या होत्‍या.

त्‍यानंतर आता पक्षाच्‍या पाटो येथील कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षांच्या लेखी परवानगीशिवाय प्रवेश करण्‍यास, पक्षाची मालमत्ता किंवा कागदपत्रे पाहून ती काढून नेण्‍यास, त्यांची प्रत काढण्‍यास, त्यात फेरफार करण्‍यास तसेच त्यात हस्तक्षेप करण्यास त्‍यांनी सक्त मनाई केली आहे. इतर पदाधिकाऱ्यांचाही रोष बोरकर यांच्‍याकडून जे काही घडत आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. ‘आरजीपी’ला तळागाळापर्यंत पोहोचण्‍यासाठी आम्‍ही घाम गाळला आहे. हा पक्ष पुढे नेण्‍यास आम्‍ही सक्षम आहोत, असे इतर पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवले.

RGP Party Office Access Restrictions
Goa politics: "जनतेची दिशाभूल करण्यासाठी खोटी माहिती पसरवली!" फेरफार केलेल्या व्हिडिओ प्रकरणावरून, अजय खोलकर यांचा थेट आरोप

राष्‍ट्रीय अध्‍यक्ष ७० दिवस फिरकले नाही

आमदार बोरकर हे ‘आरजीपी’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. संस्थापक सदस्‍य या नात्‍याने प्रत्‍येक वर्षी नूतनीकरण करावे लागते. परंतु, बोरकर यांनी कधीही नूतनीकरण केले नाही. १७ जुलै २०२१ रोजी ‘अध्‍यक्ष’ या नात्‍याने त्‍यांनीच पक्षाचे सर्व अधिकार कोअर समितीला दिले होते. ते कधीच पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष नव्‍हते. तसे असते तर गेली ७० दिवस ते कार्यालयात का आले नाहीत, असा सवाल खोलकर यांनी उपस्‍थित केला.

नोटिसीत काय म्हटले?

पक्षाच्या मालमत्तेची अखंडता, गोपनीयता आणि सुरक्षा जपण्यासाठी तसेच पक्षाच्‍या हितास बाधा आणू शकणारा कोणताही अनधिकृत गैरवापर रोखण्यासाठी हे उपाय योजले आहेत. पक्षाचे सर्व सदस्य, माजी पदाधिकारी, कर्मचारी यांना या आदेशाचे पालन करावे लागेल. राष्ट्रीय अध्यक्षांकडून पुढील सूचना मिळेपर्यंत हा आदेश अंमलात राहील, असे आमदार बोरकर यांनी आदेशात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com