Margao News : ‘आरजी’च्‍या कार्यक्रमाला दिलेली परवानगी मडगाव रवींद्र भवनने केली अचानक रद्द

भाजप सरकार भेदभाव करीत असून हे कृत्‍य लोकशाहीविरोधी
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे (आरजी) काल शुक्रवारी संध्याकाळी मडगाव रवींद्र भवनाच्या कृष्णकक्षात पक्षाच्‍या युवा कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी शुल्क भरून कक्षाचे आरक्षणही करण्यात आले होते.

मात्र रवींद्र भवनाच्या कार्यकारी समितीने या कार्यक्रमास दिलेली परवानगी अचानक रद्द केल्याने पक्षाच्‍या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. पक्षाचे अध्यक्ष मनोज परबही या कार्यक्रमाला आले होते.

याबाबत बोलताना ‘आरजी’चा युवा कार्यकर्ता एशलॉन रॉड्रिगीस यांनी सांगितले की आम्ही शुक्रवारी दुपारी २.३० ते संध्‍याकाळी ६.३० या वेळेसाठी कक्ष आरक्षित केला होता. आरक्षण करतेवेळी आम्हाला काहीही सांगितले नाही व नंतर अचानक परवानगी रद्द करण्यात आली.

Amit Patkar
Goa Crime News : जयेश चोडणकर खून प्रकरणातील संशयितांच्या लाय डिटेक्टर चाचणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

मडगाव रवींद्र भवनात भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मग आम्हालाच परवानगी का नाकारली जाते? भाजप सरकार भेदभाव करीत असून हे कृत्‍य लोकशाहीविरोधी आहे.

मनोज परब, ‘‘आरजी’चे अध्यक्ष

रवींद्र भवनात राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना परवानगी नाही. हे सांस्कृतिक केंद्र असून त्याचे पावित्र्य आम्हाला सांभाळायचे आहे. कार्यक्रम राजकीय हे समजल्‍यावर परवानगी रद्द केली.

राजेंद्र तालक, मडगाव रवींद्र भवनाचे अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com