Mayem Farmers: आधी ‘गाव’ बघा, मग ‘खाणी’! डिचोलीतील बैठकीत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची संतप्त मागणी; पंचसदस्यांची दांडी

Bicholim Meeting: गावचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष झाल्यास खाणी सुरु करण्यास आमचा विरोध असणार. वेळप्रसंगी खाणीवर धडक देण्यात बेईल, असा इशाराही मयेवासीयांनी दिला.
Mayem Farmers: आधी ‘गाव’ बघा, मग ‘खाणी’! डिचोलीतील बैठकीत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची संतप्त मागणी; पंचसदस्यांची दांडी
Mayem FarmersDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: गावच्या हिताचा विचार करुन गावचे ज्वलंत प्रश्न अगोदर सोडवा आणि नंतरच खाण व्यवसाय सुरु करा, अशी मागणी खाणपीडित शेतकऱ्यांसह मयेतील ग्रामस्थांनी बुधवारी (1 जानेवारी) डिचोलीत झालेल्या शासकीय बैठकीत केली.

मयेवासीयांचा इशारा

गावचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष झाल्यास खाणी सुरु करण्यास आमचा विरोध असणार. वेळप्रसंगी खाणीवर धडक देण्यात बेईल, असा इशाराही मयेवासीयांनी दिला. शिरगाव-मये ब्लॉकअंतर्गत येणारी पैरा येथील पूर्वाश्रमीची चौगुले'ची खाण आता साळगावकर शपिंग कंपनीच्या ताब्यात आली आहे. ही खाण सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी खाणपीडित मयेतील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती.

Mayem Farmers: आधी ‘गाव’ बघा, मग ‘खाणी’! डिचोलीतील बैठकीत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची संतप्त मागणी; पंचसदस्यांची दांडी
Mayem In High Alert : मयेतील शेतकऱ्यांसाठी नववर्षाचे गिफ्ट! गावाला मिळणार ‘तिळारी’ प्रकल्पाचे पाणी

बैठकीला पंच सदस्यांची दांडी

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या चेंबरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीवेळी उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्यासह मामलेदार प्रवीण गावस, साळगावकर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस मये-वायंगिणी पंचायतीचे सरपंच कृष्णा चोडणकर यांच्यासह सुवर्णा चोडणकर, वासुदेव गावकर आणि दिलीप शेट या चार पंचसदस्यांनी उपस्थिती लावली होती, तर सात पंचसदस्य बैठकीला अनुपस्थित होते.

Mayem Farmers: आधी ‘गाव’ बघा, मग ‘खाणी’! डिचोलीतील बैठकीत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची संतप्त मागणी; पंचसदस्यांची दांडी
Stray Cattle in Mayem: पंचायतीमध्ये तक्रार नोंदवून देखील मये येथील भटक्या गुरांचा त्रास कायम

खाण अवलंबितांचे प्रश्न सोडवा!

कृष्णा गडेकर, सखाराम पेडणेकर, कृष्णा चोडणकर, रमेश माईणकर, विश्वास चोडणकर, तुळशीदास चोडणकर, विजय पोळे आर्दीनी गावचे प्रश्न बैठकीत मांडले. बैठकीत ग्रामस्थांनी मांडलेले प्रश्न गांभीर्याने विचारात घेण्यात येतील, असे आश्वासन खाण कंपनीचे प्रतिनिधी नाईक यांनी दिले, तर खाणी सुरू करण्यापूर्वी खाणअवलंबित घटकांचे प्रश्न सोडवा, असे आमदार शेट यांनी कंपनीला सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com