Mayem In High Alert : मयेतील शेतकऱ्यांसाठी नववर्षाचे गिफ्ट! गावाला मिळणार ‘तिळारी’ प्रकल्पाचे पाणी

Tillari Dam Water To Mayem: ‘तिळारी’धरण प्रकल्पाचे पाणी आता मये गावाला मिळणार असून, मयेतील शेतकऱ्यांची प्रलंबित प्रतीक्षा संपणार आहे. नववर्षात ‘तिळारी’ पाणी मये गावापर्यंत पोचणार आहे.
Tillari Dam Water To Mayem
Tillari Dam NewsDG
Published on
Updated on

Tillari Dam Water Supply to Mayem Farmers

डिचोली: ‘तिळारी’धरण प्रकल्पाचे पाणी आता मये गावाला मिळणार असून, मयेतील शेतकऱ्यांची प्रलंबित प्रतीक्षा संपणार आहे. नववर्षात ‘तिळारी’ पाणी मये गावापर्यंत पोचणार आहे. तिळारीच्या सहकार्याने जलस्रोत खात्यातर्फे ‘काडा’तंर्गत जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यात आला असून, या प्रकल्पाचा शुभारंभही करण्यात आला आहे.

या प्रकल्पावर सुमारे ३ कोटी खर्च करण्यात येणार आहे. मये गावाला जोडून असलेल्या नार्वे गावापर्यंत तिळारीचे पाणी यापूर्वीच पोचले आहे. नार्वे गावातून हे पाणी मये गावाला पुरविण्यात येणार आहे. साधारण १४ किलोमीटर अंतर क्षेत्रात मोठ्या जलवाहिन्या घालून हे पाणी मये गावात पुरविण्यात येणार आहे.

Tillari Dam Water To Mayem
Tillari Dam: गोव्याच्या वाट्याला आणखीन पाणी येणार! 'तिळारी'ची उंची वाढवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन

५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

जलसिंचन प्रकल्पाद्वारे ‘तिळारी’चे पाणी मये गावात पोचल्यानंतर ५०० हून अधिक हेक्टर जमीन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे तिळारीच्या पाण्यामुळे शेती, बागायती फुलवण्यासाठी मदत होणार आहे. ''तिळारी'' धरण प्रकल्पाच्या पाण्याचा मये गावाला लाभ मिळावा. यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. दोन-तीनवेळा ग्रामस्थांच्या बैठकाही झाल्या होत्या. मात्र पाट बांधून पाणी गावात आणण्याचा प्रस्ताव मागे पडला होता. आता जलवाहिनीद्वारे हे पाणी मये गावात आणण्यात येणार आहे. त्यामुळे ''तिळारी''च्या पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या मयेतील शेतकरी आणि बागायतदारांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com