Kushavati River Flood | Goa Rain
Kushavati River Flood | Goa RainDainik Gomantak

प्रवाहात अडकलेल्या तरुणाला सुखरुप बाहेर काढलं

पारोडा पूल गेला पाण्याखाली; दक्षिण गोव्यातील जनजीवन विस्कळीत
Published on

मडगाव : गोव्यात सोमवार सकाळपासून बरसणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरीही अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. गोव्यात काही भागांमध्ये अजूनही पाऊस सुरु असून कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा पूल पाण्याखाली गेला आहे. यातच पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

कुशावती नदी मुसळधार पावसामुळे सध्या दुथडी भरून वाहत आहे. त्यातच आज सकाळी एक युवक नदीच्या प्रवाहात भाट केपे येथे झाडाच्या फांदीला पकडून मदतीसाठी हाक मारत होता. लोकांना हा युवक दिसताच त्यांनी केपे पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी कुडचडे अग्निशामक दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर युवकाला पाण्याबाहेर काडून जीवदान दिले.

Kushavati River Flood | Goa Rain
मुंबईत मच्छिमाराची हत्या करणाऱ्या आरोपीचं गोवा कनेक्शन

पाण्यात अडकलेल्या या युवकाचे नाव सुनील चव्हाण (30) असून तो कुठे राहतो याची माहिती कळू शकलेली नाही. त्याला पुढील उपचारासाठी मडगाव येथे जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे केपे पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान पावसामुळे मडगाव ते केपे मुख्य रस्त्यावर पाणी साठले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चांदरमार्गे वळवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com