मुंबईत मच्छिमाराची हत्या करणाऱ्या आरोपीचं गोवा कनेक्शन

2020 मध्ये गोव्यात एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मुंबईतील एका मच्छिमाराची हत्या करणाऱ्या आरोपीबाबत आता आणखीन एक खुलासा समोर आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील 55 वर्षीय मच्छिमाराची बाबूलनाथ परिसरात 23 वर्षीय सेक्युरिटी गार्डने डोक्यात दगड घालून हत्या केली होती. आता तपासामध्ये 2020 साली त्याने गोव्यातही अशाच प्रकारे हत्या केल्याचं उघड झालं आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज यादव नावाच्या आरोपीने रागाच्या भरात मच्छिमाराची निर्घृण हत्या केली आहे. इतकंच नाही तर घटनास्थळावरुन निघताना आरोपीने आपलं नावही त्याठिकाणी लिहून ठेवलं होतं. मूळचा मध्यप्रदेशचा राहणाऱ्या सुरजने मुंबादेवी परिसरात एक दिवसासाठी सुरक्षारक्षकाचं काम केलं होतं. कामावरुन निघण्यापूर्वी एक दिवस आधी त्याने मच्छिमाराची हत्या केली. ताडदेवमधील एका एजन्सीने त्याला सुरक्षारक्षकाच्या कामासाठी ठेवलं असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Crime News
फोंडा बसस्थानकाचा कायापालट होणार; सरकारकडून 1.1 कोटींचा निधी मंजूर

21 जून रोजी गजानन पवार नावाच्या मच्छिमाराचा मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास सापडला होता. दगडाने ठेचून हत्या केल्याने त्यांचा चेहरा ओळखताही येणं कठीण होतं. मृताचा मुलगा मनोहर पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आरोपीने घटनास्थळावर आपलं नाव लिहिल्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तपासामध्ये आरोपीने यापूर्वीही अशाच प्रकारे 2020 मध्ये गोव्यात एकाची हत्या केल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आरोपी यादवला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तो याआधी गोव्यात कळंगुट परिसरात एका हॉटेलमध्ये काम करत होता, असंही तपासात उघड झालं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com