गोव्यातील कामगार विरोधी कायदे मागे घ्या; आयटेक सरचिटणीस फोन्सेका यांची मागणी

भाजपाचे सरकार सत्तेवर आले हे सरकार कामगार विरोधी, लोकविरोधी व देश विरोधी आहे: खिस्तोफर फोन्सेका
Repeal anti-labor laws in Goa says Christopher Fonseca
Repeal anti-labor laws in Goa says Christopher Fonseca Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील बारा टक्के जनता बेरोजगार आहे, दिल्लीत अकुशल कामगारांना रोजंदारी 600 रूपये देण्यात येते तर गोव्यात 380 रूपये देण्यात येतात. अकुशल कामगारांना 750, समकुशल कामगारांना 825, कुशल कामगारांना 910, तर उच्चतम कुशल कामगारांना किमान 1000 रूपये रोजंदारी मिळावी तसेच कामगार विरोधी कायदे मागे घ्यावे अशी मागणी आयटेकचे गोवा (Goa) समितीचे सरचिटणीस खिस्तोफर फोन्सेका यांनी केली. ते मोर्चात सहभागी झाले असता माध्यमांशी बोलत होते. (Repeal anti-labor laws in Goa says Christopher Fonseca)

Repeal anti-labor laws in Goa says Christopher Fonseca
रोहित मोन्सेरात पुन्हा पणजीच्या महापौरपदी बसण्यासाठी सज्ज

केंद्र सरकारच्या (Central Government) धोरणाविरूध्द देशव्यापी संप फुकारण्यात आला होता. अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) गोवा च्या नेतृत्वाखाली पणजी कंदबा बसस्थानक ते चर्चस्क्वेर पर्यंत मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गोव्यातील सरकारी, औद्योगिक तसेच खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी संघटनांनी सहभाग नोंदवला होता.

Repeal anti-labor laws in Goa says Christopher Fonseca
गोव्यात उपसभापती पदासाठी रेजिनाल्ड यांचेही नाव

खिस्तोफर फोन्सेका पुढे म्हणाले, 2014 मध्ये भाजपाचे (BJP) सरकार सत्तेवर आले हे सरकार कामगार विरोधी, लोकविरोधी व देश विरोधी आहे. राष्ट्रीय कंपन्या अदानी अंबनी तसेच टाटा बिर्लांना विकत आहेत. हे सरकार भांडवलदारांना अधिक बळकट करत असून गरीबांना अधिक गरीब करत आहे. सरकारने कामगार विरोधी चार काळे कायदे आणले आहेत, शेतकरी व कामगारांना आपल्या डोळ्यात तेल घालून रहावे लागेल कारण सत्ताधारी पक्ष केव्हा हमला करेल हे सांगता येत नाही. महागाई एवढी वाढली आहे की जगणे कठीण झाले आहे. डिजेल, पेट्रोल, एल.पी.जी. यांचे दर वाढले आहेत सरकारने अबकारी कर कमी करावेत असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com