रोहित मोन्सेरात पुन्हा पणजीच्या महापौरपदी बसण्यासाठी सज्ज

पणजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची आज होणार निवड
Rohit Monserratte, Rohit Monserratte News Updates, Panjim Mayor Election News
Rohit Monserratte, Rohit Monserratte News Updates, Panjim Mayor Election NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : पणजी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज बुधवारी 30 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यातील महापौर पदासाठी रोहित मोन्सेरात, तर उपमहापौर पदासाठी संजीव नाईक यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे रोहित मोन्सेरात यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणाच बाकी असल्याचं चित्र आहे. (Rohit Monserratte News Updates)

Rohit Monserratte, Rohit Monserratte News Updates, Panjim Mayor Election News
थकीत वेतनासाठी आयुष रुग्णालयाच्या कामगारांचा एल्गार

पणजी (Panjim) पालिकेच्या महापौरपदासाठी विरोधकांतर्फे एकही अर्ज आलेला नाही अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांनी महापौरपदासाठी पुन्हा अर्ज सादर केला आहे. मात्र त्यांच्याविरोधात एकही अर्ज न आल्याने रोहित हेच पुन्हा पणजीच्या महापौरपदी बसणार हे जवळपास निश्चित झालं आहे. (Panjim Mayor Election News)

Rohit Monserratte, Rohit Monserratte News Updates, Panjim Mayor Election News
गोव्यात उपसभापती पदासाठी रेजिनाल्ड यांचेही नाव

पणजी महापालिकेचे विद्यमान उपमहापौर वसंत आगशीकर यांनी अर्ज दाखल केलेला नाही. त्यांच्या जागी संजीव नाईक यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज केला आहे. ही निवडणूक (Election) महापालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. आमदार मोन्सेरात समर्थक गटाकडे 25 नगरसेवक आहेत. तर विरोधी नगरसेवकांची संख्या फक्त 5 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com