गोव्यात उपसभापती पदासाठी रेजिनाल्ड यांचेही नाव

फळदेसाई यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता,उल्हास तुयेकर यांच्याकडून अनुमोदन
MLA Reginald Lawrence News
MLA Reginald Lawrence NewsDainik Gomantak

मडगाव : उपसभापती पदासाठी सत्ताधारी गटाकडून सुभाष फळदेसाई यांच्या बरोबरच कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही उमेदवारी भरली असून, रेजिनाल्ड यांनाच आता उपसभापती केले जाणार असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फळदेसाई यांना मंत्री करावे अशी मागणी काही भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केल्याने शेवटच्या क्षणी रेजिनाल्ड यांना उपसभापती पदाचा अर्ज भरण्यास सांगितले गेल्याचे समजते. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सूचक आणि उल्हास तुयेकर अनुमोदन दिल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. (MLA Reginald Lawrence News Updates)

सुरुवातीला रेजिनाल्ड यांना मंत्री (Minister) करुन फळदेसाई यांना उपसभापतीपद देण्याचे ठरविले होते. मात्र काणकोण, केपे, सांगे, तसेच सावर्डे हे चार मतदारसंघ मंत्रिमंडळातून बाहेर असल्याने लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे काही नेत्यांनी भाजप श्रेष्ठींना पटवून दिल्याने आता हा बदल करण्यात आल्याची माहिती आहे. रेजिनाल्ड यांना उपसभापती हे तटस्थ पद देण्याची चालही भाजपतर्फे खेळण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

फळदेसाई हे भाजपचे (BJP) मूळ कार्यकर्ते असून काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या चार तालुक्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क असल्याने त्यांना मंत्री केल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो हे आम्ही पक्षनेत्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून रेजिनाल्ड (Reginald Lawrence) यांना उपसभापती पदाचा अर्ज भरण्यास सांगितले असावे, असे फळदेसाई यांच्या कार्यकर्त्यानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com