Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomnatak

विश्‍‍वजीत राणे देणार ‘त्‍या’ महिलेला घर बांधून

संध्या म्हाळशेकर या महिलेचे घर वडाच्या झाडामुळे संकटात सापडले
Published on

वाळपई: म्हाऊस-सत्तरी येथील संध्या म्हाळशेकर या महिलेचे घर वडाच्या झाडामुळे संकटात सापडले होते. त्याची दखल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली असून घर बांधून देण्‍याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे तिला मोठा आधार मिळणार आहे.

संध्या रोहिदास म्हाळशेकर हिच्‍या घराजवळ वडाचे झाड आहे. पाच वर्षांपूर्वी त्या वडाच्या झाडाने तिच्या घराला वेढा घालण्यास सुरूवात केली व बघता बघता संपूर्ण घरच कवेत घेतले. त्या कुटुंबाला त्या घरात राहताही येत नाही. संध्‍याला तीन मुले. रोजंदारीवर कामाला जाऊन ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

Vishwajeet Rane
4 वर्षांपूर्वी उद्‌घाटन; तरीही कांदोळीतील उद्यान उघडेना!

तिचा बेकरीचा व्यवसाय होता, पण तोसुद्धा गेली पाच वर्षे बंद आहे. घर कधीही कोसळू शकते. नवीन घर बांधायचे तर पैसा नाही. त्यामुळे त्या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले आहे. सरकारी यंत्रणांकडूनही संध्याच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळाला नाही. नवीन घर बांधायला कुणाचा तरी आधार मिळेल का, या विवंचनेत असतानाच आता राणेंनी पुढाकार घेतला आहे.

दरम्‍यान, संध्या म्हाळशेकर हिची ही व्‍यथा प्रसारमाध्‍यमांनी लावून धरली होती. त्‍यामुळे आता तिला न्‍याय मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com