Girish Chodankar : 'त्या' मंत्र्याची हकालपट्टी करा; गिरीश चोडणकरांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी जमीन हडप प्रकरणात भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप केला आहे.
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak

Goa Congress : गेल्या काही दिवसात गोव्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरुन विरोधी पक्षांनी भाजप सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. आता काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी जमीन हडप प्रकरणात भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना चोडणकर यांनी याप्रकरणात दोषी असलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी थेट आव्हानच दिलं आहे.

पर्वरी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी 20 जुलै 2022 रोजी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ज्यात पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर करत जमीन घोटाळा झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. याच प्रकरणात दक्षता खाते तसंच पंचायत संचलनालयाकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र ना पोलीस ना एसआयटी कुणीही याप्रकरणी तपास न केल्याचा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे. आता विशेष तपास पथकाकडेही या प्रकरणात तक्रार दाखल केल्याचं चोडणकर यांनी स्पष्ट केलं आहे.

पोलिसांनी राजकीय दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे. मुंबईस्थित एका व्यक्तिने राजकारण्यांच्या मदतीने गोव्यातील नागरिकांना लुबाडलं आहे. तसंच त्याने या जागेवर बांधकामही सुरु केलं आहे. जर मुख्यमंत्री याप्रकरणी कारवाई करण्यात असमर्थ असतील तर आपण विशेष तपास पथक आणि साल्वादोर द मुंद पंचायतीपुढे पुन्हा दुसरी तक्रार करण्यात तयार असल्याचं चोडणकर यांनी म्हटलं आहे.

Girish Chodankar
Goa News : फातोर्ड्यात डुक्करांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने घबराट

अँथनी मॅन्युअल रिबेलो आणि हेझल सेवेरिनो मेंडोंका यांच्या 3250 चौमी जमिनीच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, जो साल्वादोर द मुंद पंचायत क्षेत्रातील 221/25 सर्व्हे क्रमांकावर नोंदवण्यात आला आहे. आता आपण विशेष तपास पथक नेमकी कोणती कारवाई करतं याची वाट पाहणार आहे, असं गिरीश चोडणकर म्हणाले आहेत. तसंच याच मंत्र्यने आणखीही घोटाळे केले आहेत, जे लवकरच उघड करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना थेट आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातून संबंधित भ्रष्ट मंत्र्यांची लगेच हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. चोडणकर यांनी म्हटलंय की याप्रकरणी आपण याआधी 25 जूननंतर 7 ऑगस्ट आणि 21 ऑगस्ट रोजी कारवाईची मागणी केल्याचंही सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांचं याप्रकरणी मौन हे एकप्रकारे त्या मंत्र्याची पाठराखण केल्यासारखंच असल्याचं गिरीश चोडणकर यांनी म्हटलं आहे. चोडणकर यांनी याप्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणी विशेष तपास पथकाकडे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com