डिचोली - पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांसह नागरिकही पुढे सरसावत आहेत. डिचोलीतील (Bicholim) लाडफे आणि दोडामार्ग मधील महिला आणि पुरुषही सामूहिकरित्या मदतकार्यात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे लाडफे येथील विद्यार्थ्यांचा गटही मदतकार्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत. "भारत माता की जय" (Bharat Mata Ki Jay) संघटनेच्या नेतृत्वाखाली लाडफे आणि दोडामार्ग येथील स्वयंसेवी नागरिकांनी पूरग्रस्त भागात मदतकार्यही केले आहे. पुराच्या तडाख्यानंतरच्या परिस्थितीचा अनुभवही विद्यार्थ्यांनी घेतला. (Relief work for flood victims from Ladfe students, women and men aam99)
साफसफाई करताना मृत बैल
लाडफे येथील सरकारी शाळेच्या (government school) विद्यार्थ्यांच्या एका गटाने मुख्याध्यापक श्रीगणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळपईतील गोशाळेत मदतकार्य केले. विद्यार्थ्यांनी 'ट्रॉली' ही हातात धरली. साफसफाई करतानाच परिसरात पुरात वाहून गेलेले बॅरेल आदी वापरण्यायोग्य सामानही विद्यार्थ्यांनी गोळा केले. साफसफाई करताना गोशाळेजवळ पुरात बळी पडलेला एक बैलही या मुलांना आढळून आला. समाजासाठी आपणही काही करू शकतो. ही भावनाही मदतकार्य करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होती.
महिलांसह पुरुषांकडून मदतकार्य
'भारत माता की जय" संघटनेच्या बॅनरखाली लाडफे आणि दोडामार्ग येथील महिला आणि पुरुष मिळून स्वयंसेवी नागरिकांनी वेळूस भागातील काही घरांनी जावून झाडलोट आदी साफसफाई केली.निर्मल नारायण चननकर, सपनेशा सुधाकर धुरी, विमल प्रेमनाथ कोटकर, गिरीष्मा नंदा धुरी, दक्षता दत्ता मळीक, सेजल गोकुळदास लाड, गिरीष्मा सदाशिव मळीक, सिया दिलिप परब, रुची विठू मळीक, वैशाली रघुनाथ मळीक, श्रीगणेश गोपाळ गावडे, शुभांगी गणेश गावडे, सदाशिव गोविंद मळीक, संगीता सुशांत राऊत.
आचल अभय शिरोडकर, मनिशा संतोष आरोंदेकर, संजना संजय बेतकेकर, यशवंत भिवा मळीक, योगिता यशवंत मळीक, पल्लवी मनोज खांबल, क्रांती मितेश कुबल, सुभद्रा अर्जुन मेरवा, मितेश लक्ष्मण कुबल यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. मदतकार्यात युवतींही सहभागी झाल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.