Maje Ghar Scheme: पालिका जमिनीवरील घरांनाही दिलासा द्या! 'माझे घर' योजनेत आमदार आमोणकरांची मागणी

My House Scheme Goa Latest: सरकारी जमिनीवरील घरे ‘माझे घर’ योजनेअंतर्गत नियमित करताना नागरिकांना विशेष अडचणी येत नाहीत.
My House Scheme Goa Latest
Maje Ghar SchemeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी जमिनीवरील घरे ‘माझे घर’ योजनेअंतर्गत नियमित करताना नागरिकांना विशेष अडचणी येत नाहीत. मात्र, नगरपालिकेच्या जमिनीवरील घरांच्या नियमितीकरणासाठी आवश्यक परवानग्या घेताना नागरिकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय. अधिकाऱ्यांकडून ना हरकत दाखला (एनओसी) मिळत नसल्याने अनेक नागरिक अडचणीत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत योग्य तो मार्ग काढून संबंधितांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली.‘माझे घर’ योजनेबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना आमोणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

My House Scheme Goa Latest
Goa Casino: 'हे तर होणारच होते, पुढेही होतच राहणार!' कॅसिनोच्या विळख्यात बदललेल्या गोव्याची अस्वस्थ करणारी कहाणी

मुख्यमंत्री सावंत यांच्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य आणि गरीब गोमंतकीयांच्या घरांवर असलेली टांगती तलवार दूर झाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे आमोणकर म्हणाले. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे आभार मानले. आता पालिका जमिनीवरील घरांबाबतही सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com