Ponda Municipal Council: फोंडा नगराध्यक्षपदी रितेश तर उपनगराध्यक्षपदी दीपा कोलवेकर यांची निवड

निवडणुकीत १० विरुद्ध ५ असे बलाबल दिसून कृषिमंत्री रवी नाईक यांचेच वर्चस्व सिद्ध झाले.
Ponda Municipal Council Election
Ponda Municipal Council Election Dainik Gomantak

Ponda Municipal Council: फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदी रितेश नाईक तर उपनगराध्यक्षपदी दीपा कोलवेकर यांची आज निवड करण्यात आली. निवडणुकीत १० विरुद्ध ५ असे बलाबल दिसून कृषिमंत्री रवी नाईक यांचेच वर्चस्व सिद्ध झाले.

Ponda Municipal Council Election
Plastic Rice in Goa: मुख्यमंत्री म्हणतात...‘तो’ प्लास्टिकचा नव्हे; तर प्रोटीनयुक्त फॉर्टीफाईड तांदूळ

विरोधी गट असलेल्या रायझिंग फोंडातर्फे नगराध्यक्षपदासाठी शिवानंद सावंत तर उपनगराध्यक्षपदासाठी वेदिका वळवईकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. हात उंचावून मतदान घेतले असता, नगराध्यक्षपदासाठी रितेश आणि उपनगराध्यपदासाठी दीपा यांना प्रत्येकी पाच मते मिळाली.

दरम्यान, बैठकीला उपस्थित राहण्यास पत्रकारांना मज्जाव करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व पत्रकारांनी पालिका इमारतीसमोरील उद्यानात थांबणे पसंत केले. जेथे खुद्द रवी नाईक व इतरांनी येऊन पत्रकारांची भेट घेत प्रकरण मिटवले.

फोंड्यातील महत्त्वाकांक्षी मास्टरप्लॅन प्रकल्पासह मार्केट संकूल उभारणे तसेच गोल्डन ज्युबिली प्रकल्प पूर्ण करणे, सर्व पंधराही प्रभागात विकासकामे करणे आणि फोंडा पालिका क्षेत्रातील समस्या सोडवताना सुशासन देण्याचा माझा प्रयत्न राहील.

- रितेश नाईक, नगराध्यक्ष, फोंडा

फोंडा मतदारसंघात आतापर्यंत मी स्वतः अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत, आता मास्टरप्लॅन तसेच इतर कामे पूर्ण करण्यासाठी फोंडा पालिकेला आवश्‍यक सहकार्य करण्याबरोबरच राज्य आणि केंद्र सरकारचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- रवी नाईक, आमदार तथा कृषीमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com