
पणजी: गोवा रिअल इस्टेट रेग्युलेटरी प्राधिकरणाकडे (गोवा रेरा) डीएलएफ एक्सक्लुझिव्ह फ्लोअर्स प्रा. लि. आणि भामिनी रिअल इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. या दोन विकसकांनी आपल्या ‘द बे व्ह्यू’ या रिअल इस्टेट प्रकल्पाची नोंदणी मागे घेण्यासाठी/रद्द करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. हा प्रकल्प रेईश मागूशमधील डीएलएफ प्रकल्प म्हणून ओळखला जात असून तो रद्द केला जात असल्याची चर्चा आहे.
या प्रकल्पासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून विरोध करण्यात येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी आणि पर्यावरणप्रेमींनी याला विरोध करत न्यायालयात खटले दाखल केले होते. काही बाबतीत न्यायालयीन आदेश व निर्णयही आले होते.
या पार्श्वभूमीवर अखेर डीएलएफ कंपनीने हा संपूर्ण प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या प्रकल्पासाठी डोंगर कापणी परवानगी १९९० मध्ये देण्यात आली होती. त्यांचे २००८ मध्ये पुनरावलोकन झाले होते.
हा वाद वाढल्यानंतर राज्य सरकारने गेल्या सहा महिन्यांत डोंगर कापणीसाठी कोणतीही नवीन परवानगी जारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीचा पुनरावलोकन आदेश जारी केला होता. त्यात म्हटले होते, की नियमभंग आढळल्यास परवानग्या रद्द केल्या जातील. येथील
डोंगर कापणी ३-५ मीटरपेक्षा अधिक झाल्याने दरड कोसळण्याचा आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी यांचा सातत्याने विरोध होता. कारण, या प्रकल्पाच्या जागेचा विकास नियोजन आराखड्यात ‘ग्रीन झोन’ म्हणून उल्लेख करण्यात आला होता. मात्र, डीएलएफने या जागेचा वापर निवासी बंगल्यांसाठी केला, असा आरोप केला जात होता.
बार्देश तालुक्यातील वेरे, रेईश-मागूश या ठिकाणी डीएलएफ कंपनीने उभारलेल्या ‘रेश मागुशा’ या बहुचर्चित प्रकल्पावर अखेर कंपनीने पडदा टाकला आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या ८० बंगल्यांची नोंदणी रद्द करण्यासाठी कंपनीने रजिस्ट्रार ऑफ रिअल इस्टेट (रेरा) यांच्याकडे अर्ज केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.