South Goa Election 2024: दक्षिण गोव्यात आज विक्रमी मतदानाची शक्यता; विरियातो अन् पल्लवी यांच्यात निकराची लढाई

South Goa Lok Sabha Election 2024 Voting: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज ११ राज्यांतील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
South Goa Lok Sabha Election 2024 Voting
South Goa Lok Sabha Election 2024 VotingDainik Gomantak

South Goa Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज ११ राज्यांतील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यात गोव्यातील उत्तर व दक्षिण गोवा या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. पहिल्या दोन टप्प्यांत सरासरी ६५ ते ६६ टक्के मतदान झाले आहे. उद्या दक्षिण गोव्यात विक्रमी ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

South Goa Lok Sabha Election 2024 Voting
Lok Sabha Election 2024: गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी आज मतदान; 16 उमेदवारांचे भवितव्‍य मतदारांच्‍या हाती

दक्षिण गोव्यात (South Goa) मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून वीसही मतदारसंघांतील एकूण ८६२ मतदानकेंद्रांवरील सर्व कर्मचारी आपापले साहित्‍य घेऊन फातोर्डा येथील पं. नेहरू स्टेडियमवरून मतदानकेंद्रांवर रवाना झाले. संध्याकाळपर्यंत त्यांनी मतदानकेंद्रांवरील व्यवस्था पूर्ण केली. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्यास ते सज्ज झाले आहेत. मतदान संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे.

आज सकाळपासून फातोर्डा येथील पं. नेहरू स्टेडियमवर निवडणुकीसाठी नियुक्त केलेले हजारो कर्मचारी हजेरी लावत होते. या प्रवाशांना मतदानकेंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारचे जेवण, शीतपेये, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पन्नाप्रमुख निभावणार महत्त्‍वपूर्ण कामगिरी

विक्रमी मतदान व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या ‘आयकॉन’कडून गेल्या काही दिवसांपासून विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. शिवाय सर्व पक्षांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने (BJP) यंदा ‘पन्नाप्रमुख’ ही नवी संकल्पना कार्यान्वित केली. ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करणार आहेत

South Goa Lok Sabha Election 2024 Voting
Lok Sabha Election 2024: लोकशाहीच्‍या उत्सवासाठी 'गोवा' सज्ज; मतदान केंद्रे सजली; कडक बंदोबस्तात पार पडणार मतदान

उन्‍हापासून मिळणार ‘गारवा’

यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक मतदारांना मैत्रिपूर्ण अशी असून मतदारांसाठी मतदानकेंद्रांवर अनेक सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आल्‍या आहेत. कडक उन्हाचे दिवस असल्‍याने मतदानकेंद्रावर पिण्याचे पाणी, शीतपेये, लिंबूपाणी, अल्पोपाहार, विश्रांतीसाठी खोली, दिव्यांगासाठी व्हील-चेअरची व्यवस्था आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com