Goa Rain: राजधानीत विक्रमी पाऊस! पणजी जलमय

Panjim: पणजीत रेकॉर्ड ब्रेक पर्जन्यवृष्टी; एकाच दिवसात २३६ मिमी इतका पाऊस
Panjim: पणजीत रेकॉर्ड ब्रेक पर्जन्यवृष्टी; एकाच दिवसात २३६ मिमी इतका पाऊस
Goa Panjim RainDainik Gomantak

राज्याला रविवारी पावसाने विश्रांती न घेता संततधारपणे झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, नद्यांना पूर आला, दरडी कोसळल्या, जनजीवन विस्कळीत झाले. शिवाय रविवारच्या पावसाने तिघांचा बळीही घेतला. राज्यात सर्वत्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. कारण रविवारचा पाऊसच विक्रमी आणि निराळा होता. १ जुलै १९८७ नंतर अशा प्रकारच्या पावसाचा अनुभव राज्याने घेतला.

उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात बुधवार १ जुलै १९८७ रोजी राज्यात एकाच दिवसात तब्बल ३३४.७ मिमी म्हणजेच १३.१७ इंच पाऊस पडला. त्यानंतर आता ३७ वर्षांनंतर रविवार, ७ जुलै रोजी एकाच दिवसात २३६ मिमी म्हणजेच तब्बल ९.२९ इंच इतका पाऊस पडला. आतापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात एकाच दिवशी पडलेल्या पावसाच्या आकडेवारीत रविवारचा पाऊस दुसऱ्या स्थानावर आहे. एकंदरीत रविवारी पडलेला पाऊस विक्रमीच ठरला आहे.

Panjim: पणजीत रेकॉर्ड ब्रेक पर्जन्यवृष्टी; एकाच दिवसात २३६ मिमी इतका पाऊस
Goa Rain: पावसाचा हाहाकार! जनजीवन विस्कळीत

राजधानी जलमय

राजधानी पणजीसाठी रविवारचा पाऊस हा विक्रमीच नव्हे, तर रेकॉर्ड ब्रेक ठरला; कारण पणजी शहरात आजपर्यंत कधीच कोसळला नव्हता, इतका ३६०.८ मिमी म्हणजेच १४.२० इंच पावसाची नोंद करण्यात आली. स्मार्ट सिटी पणजीला अक्षरश: झोडपले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com