Panjim Municipality: महापालिका इमारतीची पुनर्बांधणी; मुख्यमंत्र्यांकडून पायाभरणी

Panjim Municipality Building: मुख्यमंत्र्यांकडून पायाभरणी : सुमारे 75 कोटींचा खर्च
Panjim Municipality
Panjim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Municipality Building: राजधानी पणजीत राज्यातील एकमेव महापालिकेच्या प्रशस्त इमारतीची गरज होती. या इमारतीचे पुनर्बांधकाम होत आहे, ही पणजीवासीयांसाठी आनंदाची बाब आहे.

सुमारे ७५ कोटी रुपये खर्चून ही प्रशस्त इमारत लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण केले जाईल.

Panjim Municipality
युपी टु गोवा, तिरुअनंतपुरम ट्रेनमध्ये दरोडा टाकून करायचे पलायन; मिर्झापूरच्या दोघांना अटक

या इमारतीचे काम गोवा राज्य नगरविकास प्राधिकरणामार्फत (जी-सुडा) केले जाणार आहे. महापालिकेचे प्रशासकीय कार्यालय असलेली ही इमारत चारमजली असेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पणजी महापालिकेच्या जुन्या जागेत नव्या इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाली.

यावेळी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, महापालिका आयुक्त क्लेन मदेरा तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.

या महापालिकेच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर बोलताना महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले की, या नव्या इमारतीचे बांधकाम कंत्राटदाराने सुरू करताच पणजी महापालिका पणजीतच इतर ठिकाणी स्थलांतर केली जाईल. एका ठिकाणी जागा पाहण्यात आली आहे.

महापालिकेच्या इमारतीत लिजवर असलेल्या दुकानधारकांशी तोडगा काढण्याच्या चर्चेला यश आले आहे. सुमारे २४ दुकानदार आहेत त्यांच्याशी चर्चा करून प्रश्‍न सोडवल्यातच जमा आहे.

Panjim Municipality
Obesity And Stress: तणाव आणि चिंता देखील वाढवू शकतात लठ्ठपणा, जाणून घ्या कसे

अशी असेल नवीन इमारतीची रचना...

पणजी महापालिकेच्या चार बाजूनी रस्ते आहेत त्यामुळे चारही बाजूनी तसेच इमारतीच्या तळघर व तळमजल्यावरही पार्किंग व्यवस्था असेल.

तळघरात सुमारे १८० वाहनांच्या पार्किंगची जागा तरतूद करण्यात आली आहे. या एकूण इमारतीचे बांधकाम ४११८ चौ. मी. क्षेत्रफळात होणार आहे.

या तीनमजली इमारतीसाठी लिफ्ट तसेच पायऱ्यांची सोय असेल. तळमजल्यावर ७२ वाहानांसाठी पार्किंग जागा असेल. पहिल्या मजल्यावर २८ दुकानांची सोय करण्यात आली आहे.

या मजल्यावर महापालिकेचे कार्यालयही असेल. याव्यतिरिक्त या मजल्यावरील १६ गाळे दुकानांसाठी तर 17 गाळे कार्यालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

दुसऱ्या मजल्यावर आणखी ६ दुकाने व १७ कार्यालये उपलब्ध असतील ती भाडेपट्टीवर देण्यात येतील. तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर पुन्हा ६ दुकाने व १७ कार्यालयासाठी गाळे उपलब्ध असतील.

याव्यतिरिक्त या इमारतीच्या मध्यभागी मोकळी जागा ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती या इमारतीचे आर्किटेक्ट सुआरिस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com