कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Devendra Fadnavis On Ravi Naik: गोव्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या शोकसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या शोकसभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी फडणवीस यांनी रवी नाईक यांच्या कार्याचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि जनसंपर्काचा गौरव करताना त्यांना “अजातशत्रू” अशी उपाधी दिली.

फडणवीस म्हणाले, “रवी नाईक हे अजातशत्रू असे व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम व्हॉलिबॉलपटू होते, आणि तीच खेळाडूवृत्ती त्यांनी राजकारणातही जोपासली. समाजातील दबलेल्या, पिचलेल्या आणि वंचित घटकांचा आवाज बनून त्यांनी आयुष्यभर कार्य केले.”

ते पुढे म्हणाले, “गृहमंत्री म्हणून घेतलेली कणखर भूमिका आणि कृषीमंत्री म्हणून जपलेली संवेदनशीलता या रवी नाईक यांच्या दोन वेगळ्या बाजू जनतेच्या नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी तयार केलेला वारसा चिरकाल टिकणारा आहे.”

CM Devendra Fadnavis
Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

रवी नाईक यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी दाखवलेले नेतृत्व, जनसंपर्क कौशल्य आणि प्रामाणिकतेबद्दल सर्व वक्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

CM Devendra Fadnavis
Tiger Reserve Goa: व्याघ्र प्राधिकरणाच्या शिफारशींकडे कानाडोळा! जैविक संपदेच्या अस्तित्वाला धोका; ‘सर्वोच्च’ निकालाकडे लक्ष

रवी नाईक यांनी गोव्याच्या राजकारणात अनेक दशकं महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते गोव्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून कार्यरत राहिले. त्यांच्या निधनाने गोवा तसेच महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com