Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Goa Exam Paper Issue: यापुढे विद्यार्थ्यांना कठीण वाटेल अशी प्रश्‍‍नपत्रिका न काढण्‍यावर आमचा भर असेल, असेएससीईआरटी संचालक मेघना शेटगावकर यांनी ‘गोमन्‍तक’शी संवाद साधताना सांगितले.
Goa SSC Exam 2025
Goa SSC Exam 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: इयत्ता तिसरीच्‍या परीक्षेत गणित विषयासाठी काढलेल्‍या प्रश्‍‍नपत्रिकेवरून सकारात्‍मक आणि नकारात्‍मक अशा दोन्‍ही प्रतिक्रिया आमच्‍याकडे येत आहेत. राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात (एनईपी) स्‍थापन केलेल्‍या मंडळाच्‍या पुढील बैठकीत यावर चर्चा होईल.

यापुढे विद्यार्थ्यांना कठीण वाटेल अशी प्रश्‍‍नपत्रिका न काढण्‍यावर आमचा भर असेल, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्‍या (एससीईआरटी) संचालक मेघना शेटगावकर यांनी शनिवारी ‘गोमन्‍तक’शी संवाद साधताना सांगितले.

Goa SSC Exam 2025
Exam Paper Issue: 3रीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ! विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसल्याचा दावा; पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

यंदा इयत्ता तिसरीसाठी ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्‍यात आली आहे. त्‍याच अनुषंगाने नुकत्‍याच झालेल्‍या तिसरीच्‍या परीक्षेत गणिताची प्रश्‍‍नपत्रिका काढली होती.

Goa SSC Exam 2025
Goa LDC Exam Result: शुभवर्तमान! 215 जणांचे सरकारी नोकरीचे स्‍वप्‍न उतरले सत्‍यात! ‘एलडीसी’साठी पात्र ठरलेल्‍यांची अंतिम यादी जाहीर

इयत्ता तिसरीच्‍या परीक्षेसाठी दिलेल्‍या गणिताच्‍या प्रश्‍‍नपत्रिकेतील प्रश्‍‍न अतिशय अवघड होते. काही विद्यार्थ्यांना ते सोडवता आले नाहीत. त्‍यामुळे पालकांनी याबाबत ‘एससीईआरटी’कडे तक्रारी नोंदवण्‍यास सुरुवात केली आहे. तर काहीजणांनी सोशल मीडियावर ही प्रश्‍‍नपत्रिका टाकून रोष व्‍यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com