Goa Politics: रवि यांच्या जागी कोण? 6 महिन्यांत पोटनिवडणूक, 'मगो'चा पाठिंबा पुत्र रितेशला

Ravi Naik: कृषी मंत्री रवि नाईक यांच्या निधनामुळे १२ सदस्यीय राज्य मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे.
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे १२ सदस्यीय राज्य मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे. ती भरण्यासाठी येत्या सहा महिन्यांत फोंडा विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक घ्यावी लागणार आहे. काही दिवसांत त्याविषयीच्या घडामोडी गतिमान होतील.

सध्या भाजप मगोची निवडुकोत्तर युती आहे. तसेच रवी पूत्र रितेश यांच्या उमेदवारीला ‘मगो’चा जाहीर पाठिंबाही आहे. त्यामुळे रितेश यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास केतन भाटीकर यांच्यासमोर राजकीय संकट उभे ठाकणार आहे. दरम्यान, विधीमंडळ सचिवालयाने फोंडा मतदार संघाची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना सायंकाळी उशिरा जारी केली.

गोविंद गावडे व आलेक्स सिक्वेरा हे मंत्रिमंडळातून गेल्यानंतर रिक्त झालेल्या दोन जागा भरण्यात आल्या. दिगंबर कामत व रमेश तवडकर यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी किमान पाचेक नवे चेहरे मंत्रिमंडळात येतील, असे सांगण्यात येत होते.

तसा इन्कारही कोणी केलेला नाही. याउलट भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आणखीनही मंत्रिमंडळ बदल होऊ शकतो, असे वक्तव्य करून राजकीय चर्चेलाच खतपाणी घातले होते. शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचा समावेश मंत्रिमंडळात होईल अशी चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आल्यानंतर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी तसे संकेत देणे सुरू केले होते.

त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल झाला पण लोबो यांची संधी हुकली. सरकारला त्यानंतर त्यांनी विविध मुद्यांवर घेरणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे लोबो यांना नाही तर त्यांच्या पत्नी दिलायला यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला आमदाराला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व दिल्याचे दाखवण्यासाठीही असे केले जाणार आहे.

गेल्या मंत्रिमंडळात ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात या मंत्री होत्या. आता विधानसभेत तीन महिला आमदार सत्ताधारी भाजपच्या गोटात असल्या तरी डॉ. दिव्या व जेनिफर यांचे पती मंत्रिमंडळात असल्याने दिलायला यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

Ravi Naik
Goa AAP Candidates : सासष्टीत 9 मतदारसंघांत ‘आप’ देणार उमेदवार! काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याची तयारी; गोवा फॉरवर्डही रिंगणात

बिनविरोध निवडून येण्याची संधी दिली जाणार?

फोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रवी नाईक करत होते. ती जागा रिक्त झाल्याचे राज्य मतदार अधिकारी भारतीय निवडणूक आयोगाला कळवतील. त्यानंतर ती जागा रिक्त झाल्याची अधिसूचना आयोग जारी करणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांत पोट निवडणूक घेतली जाणार आहे. या मतदारसंघातून मगोचे डॉ. केतन भाटीकर हे विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. कॉंग्रेसकडून राजेश वेरेकर यांची तयारी आहे. आता भाजपकडून विश्वनाथ दळवी यांच्याऐवजी रितेश यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.

दळवी यांचे पारडे अलिकडच्या राजकारणात जड होते. पालिका राजकारणावरील वरचष्मा त्यांनी सिद्धही केला होता. मात्र भावनिक कारणास्तव रितेश यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते. दुसऱ्या बाजूला विरोधकांची एकजूट होणार का याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. विरोधकांसाठी फोंड्याची पोट निवडणूक ही महत्वाची राजकीय चाचणी ठरणार आहे. एकत्र येऊन काम केल्यास कोणता प्रभाव पडू शकतो हे या पोट निवडणुकीतून दिसून येणार आहे. रवी नाईक यांना श्रद्धांजली म्हणून रितेश यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी दिली जाणार का या प्रश्नाचे उत्तरही राजकीय घडामोडींतूनच मिळणार आहे.

फोंडा तालुक्याचा वरचष्मा आता राहिलेला नाही

फोंडा तालुक्यातील प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर व फोंड्याचे आमदार रवी नाईक असे चार जण मंत्रिमंडळात होते. १२ जणांच्या मंत्रिमंडळात एका फोंडा तालुक्याचे चार मंत्री हा असमतोल आहे, असे भाजपला वाटत होते.

त्यामुळे मध्यंतरी मंत्रिमंडळ फेरबदल होऊ घातलेला होता. त्याचदरम्यान श्री देव रुद्रेश्वराची रथयात्रा रवी यांच्या प्रेरणेतून काढण्यात आली आणि मंत्रिमंडळ फेरबदल थिजला. पुढे गावडे यांना वगळण्यात आले आणि आता रवी तर इहलोकाची यात्रा संपवून निघाले. त्यामुळे मंत्रिमंडळावरील फोंडा तालुक्याचा वरचष्मा आता राहिलेला नाही.

Ravi Naik
Goa Crime: 'ड्रग्ज'प्रकरणी नायजेरियन व्यक्तीला अटक, 64 ग्रॅम गांजासह स्कूटर जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

धारबांदोडातील सावर्डेचे प्रतिनिधित्व करणारे डॉ. गणेश गावकर हे सभापती झाल्याने त्या तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाचा प्रश्न निकाली निघाला. बार्देश तालुक्यात शिवोली, हळदोणे, कळंगुट, साळगाव, पर्वरी असे मोठे मतदारसंघ असूनही रोहन खंवटे हे एकमेव मंत्री बार्देशचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे बार्देशला अजून एक मंत्रिपद हवे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. यावेळच्या मंत्रिमंडळ बदलात ती पुरी होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com