Minister Ravi Naik in Ponda : ‘पीईएस’ रवी नाईक कॉलेजला ‘ए प्लस’ दर्जा

फोंडा शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयात शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न
Ravi Naik
Ravi NaikGomantak Digital Team
Published on
Updated on

Minister Ravi Naik : फोंडा शिक्षण संस्थेच्या सर्वच महाविद्यालयात शहराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात असून या महाविद्यालयाला मानाचा ‘ए प्लस’ दर्जा मिळाल्यामुळे शिक्षण संस्थेचे नाव उज्ज्वल झाले आहे.

या यशात प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह इतर मान्यवर वाटेकरी असल्याचे उद्‍गार संस्थेचे अध्यक्ष तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी काढले. फर्मागुढी येथील फोंडा शिक्षण संस्थेच्या रवी नाईक कला व विज्ञान महाविद्यालयाला शिक्षण क्षेत्रातील मानाचा ‘ए प्लस’ दर्जा मिळाला आहे.

Ravi Naik
Goa Congress : भाजपकडून ओबीसींचे नेतृत्व संपविण्याचा डाव : गिरीश चोडणकर

त्याबद्दल संबंधितांच्या गौरवासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वेळी नगराध्यक्ष रितेश नाईक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोयलेकर, गोवा विद्यापीठ निबंधक व्ही. एस. नाडकर्णी, प्राचार्य डॉ. विकास पिसुर्लेकर, उपप्राचार्य डॉ. केळूसकर, डॉ. हेबळेकर व डॉ. अनिल डिंगे तसेच ‘ए प्लस’ दर्जा मिळवून देण्यात सहभाग असलेले प्रा. खानोलकर, डॉ. सुनिता बोरकर यांची उपस्थिती होती.

Ravi Naik
AAP Goa : काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या वाटेवर : पालेकर

फोंडा शिक्षण संस्थेच्या रवी नाईक महाविद्यालयाला ‘ए प्लस’ दर्जाचे यश मिळणार हे नक्की होते, कारण या महाविद्यालयाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. पीईएसने आता इतरांनाही याबाबतीत मार्गदर्शन करावे. ग्रामीण भागातील महाविद्यालयेही सरस ठरत आहेत.

प्रसाद लोयलेकर, उच्च शिक्षण खात्याचे संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com