आठव्या विधानसभेच्या पहिल्या काही अधिवेशनांमध्ये संयुक्त विरोधक म्हणून एकत्रित असलेले काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या आमदारांमध्ये सध्या जोरदार कलगी-तुरा रंगला आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे आणखी दोन आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केला आहे.
बुधवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार व्हेंजी व्हिएगस आणि उपाध्यक्ष वाल्मिकी नायक उपस्थित होते.
पालेकर म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय नेते बी.एल. संतोष हे अचानक गोव्यात आले. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या तीन पैकी दोन आमदार फुटले तरच ते अपात्र होणार नाहीत, असे संकेत दिले. हा सर्व घटनाक्रम पाहता 2 आमदार लवकरच भाजपवाशी होतील.
दुसरीकडे, वाल्मिकी नायक म्हणाले, फेरेरा हे भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमांना नेहमीच उपस्थित असतात. काँग्रेसचाही त्यांच्यावर विश्वास नसल्याने त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिले नाही. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही फेरेरा यांनी कुणाला मतदान केले, हे सांगितले नव्हते.
24 काँग्रेस आमदार फुटले
गेल्या सहा वर्षातील काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराचा इतिहास पाहिला तर 28 पैकी 24 काँग्रेस आमदार भाजपात गेले आहेत, असे वाल्मिकी नायक यांनी सांगितले.
हळदोणा आमदार फरेरा भाजपसाठी काम करत असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी स्वाक्षरी केलेले तथाकथित पक्षांतरविरोधी प्रतिज्ञापत्र. कायदेशीर दस्तऐवजावर स्वतः स्वाक्षरी करूनही, त्यांनी पक्षांतरानंतर दावा केला, असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.