काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यांतून किंवा भाषणामधून ओबीसी समाजाचा अपमान केलेला नाही. याउलट भाजपानेच सदैव ओबीसी समाजावर अन्याय व त्यांचा तिरस्कार केला आहे.
भाजपाने गोव्यातील ओबीसी समाजातील नेत्यांना लाचार बनवत त्यांचे नेतृत्व पद्धतशीरपणे संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
बुधवारी (ता.5) म्हापशात काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, अमरनाथ पणजीकर, अॅड. शशांक नार्वेकर, संजय बर्डे व इतर हजर होते.
मुळात भाजपाने नेहमीच ओबीसी समाजाकडे द्वेषाच्या भावनेने पाहिले. ओबीसी समाजातील अनेक राजकीय नेत्यांचे नेतृत्व भाजपाने संपविले.
याचे उदाहरण केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रवी नाईक, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री निळकंठ हळर्णकर, दत्तप्रसाद नाईक, अनिल होबळे या नेत्यांची पक्षातील स्थिती व मानसन्मान पाहून लक्षात येते.
मध्यंतरी श्रीपाद नाईक यांना सरकारी कार्यक्रमांचे साधे निमंत्रण दिले गेले नव्हते. यातूनच, भाजपाची ओबीसी समाजातील नेत्यांप्रती असलेला आदर समजतो, अशा शब्दांत चोडणकरांनी भाजपावर निशाणा साधला.
भाजपला आव्हान
आरएसएसच्या सांगण्यानुसार भाजपा वागते. मुळात आसएसएस संघटना ही आरक्षणाच्या विरोधात आहे. काँग्रेसने ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळवून दिले.
त्याउलट, नऊ वर्षांत भाजपाने ओबीसीसाठी किती कामे केलीत, ते आकड्यानुसार भाजपाने जाहीर करावे असे खुले आव्हान चोडणकरांनी भाजपाला दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.