Gray Slender Loris: गोव्यातील तांबडी सुर्लच्या जंगलात दुर्मिळ 'वनमानव' आढळल्याचा दावा

Rare Gray Slender Loris Spotted In Goa: दुर्मिळ मानला जाणारा वनमानव जवळपास नामशेष म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे. या वनमानवला सर्वोच्च पातळीचे कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे.
Gray Slender Loris
Gray Slender Loris
Published on
Updated on

सत्तरी: ‘जवळपास नामशेष’ म्हणून वर्गीकृत करण्यात आलेला वनमानव सत्तरीच्या जंगलात आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. या वनमानवचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, गोव्यात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, याची पृष्टी करणारी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

तांबडी सुर्ल जंगलात वनमानव आढळून आला असा दावा करणारा एक फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल होत असला तरी वनमानव नक्की कोठे आढळला याबाबत वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती उपलब्ध नाहीये. दरम्यान, दुर्मिळ मानला जाणारा वनमानव जवळपास नामशेष म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे. या वनमानवला सर्वोच्च पातळीचे कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे.

Gray Slender Loris
National Herald Case: सोनिया, राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार; नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणी ED कडून आरोपपत्र दाखल

गेल्या वर्षी नागवे-वाळपईत आढळला होता वनमानव

गेल्या वर्षी याच महिन्यात (एप्रिल) नागवे-वाळपईत अशाचप्रकारे वनमानव आढळून आला होता. नागवेतील परवार यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी कंपाऊंडवर ‘वनमानव’ बसलेला दिसला. वनमानवाबाबत माहिती देऊन वाइल्ड लाईफ रेस्क्यू स्क्वॉडच्या सदस्यांनी त्याला त्याच रात्री जंगलात सोडून दिले होते.

Gray Slender Loris
Cyber Fraud: गोमंतकीय व्यक्तीला 4.70 लाख रुपयांचा घातला गंडा; पंजाबच्या सराईत सायबर चोरट्याला अटक

‘जवळपास नामशेष’ म्हणून वर्गीकृत

भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची I अंतर्गत वनमानव सूचीबद्ध आहे. वनमानवाला सर्वोच्च पातळीचे कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे. तसेच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन)ने ‘लुप्तप्राय’ श्रेणीमध्ये त्याला लाल यादीत टाकलंय. या प्राण्यास २०१८ मध्ये ‘जवळपास नामशेष’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com