Cyber Fraud: गोमंतकीय व्यक्तीला 4.70 लाख रुपयांचा घातला गंडा; पंजाबच्या सराईत सायबर चोरट्याला अटक

Goa Police Cyber Crime Action: हणजूण पोलिसांनी मंगळवारी (१५ एप्रिल) केलेल्या कारवाईत तब्बल ४ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हणजूण पोलिसांनी मंगळवारी (१५ एप्रिल) केलेल्या कारवाईत तब्बल ४ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. असीम वीज (वय ३२, रा. चंदीगड, मूळ जलंदर, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यानं गोव्यासह इतर राज्यांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचं तपासात समोर आलंय.

ही कारवाई हणजूण येथील रहिवासी प्रवेश सिंग यांच्या तक्रारीनंतर करण्यात आली. सिंग यांच्या बँक खात्यातून आरोपी असीम यानं ऑनलाईन माध्यमातून ४ लाख ७० हजार रुपये उकळले होते. सिंग यांनी याबाबतची तक्रार हणजूण पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली.

हणजूण पोलिस स्टेशनचे निरीक्षक नितेश शिंगाडी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. डिजिटल उपकरणांच्या सहाय्यानं पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला शोधून काढत अटक केली.

Cyber Fraud
Goa Crime: लैंगिक अत्याचाराच्या संशयिताला कोर्टाचा दणका! पीडितचे मेसेज अन् फोटो असल्याकारणाने मोबाईल देण्यास नकार

४ दिवसांची पोलिस कोठडी

पोलिसांनी असीम वीजला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीत, आरोपी हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही आर्थिक फसवणुकीच्या गुन्हांमध्ये सामील असल्याचं समोर आलं.

तपास सुरू

म्हापशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी व उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस निरीक्षक सूरज गावस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Cyber Fraud
Goa Heat Alert: दुपारी घराबाहेर पडू नका; गोव्यात पुढील दोन दिवस उन्हाचा तडाखा वाढणार

राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ ही नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता बाळगणे, अज्ञात लिंकवर क्लिक न करणे आणि वैयक्तिक बँकिंग माहिती कोणालाही न देणे याबाबत नागरीकांनी सर्तक राहणं गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com