गुंड जेनिटो अडीच महिन्यानंतर येणार तुरुंगातून बाहेर; 5 लाख रुपयांच्या हमीवर अखेर जामीन मंजूर

Rama Kankonkar attempted murder case: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी सात ते आठ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता.
Zenito Cardozo Bail
Zenito Cardozo Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी अटकेत असणाऱ्या मुख्य संशयित गुंड जेनिटो कार्दोझला अखेर सशर्त जामीन मंजूर झाला आहे. पाच लाख रुपयांच्या हमीवर मेरशी येथील सत्र न्यायालयाने जेनिटोला जामीन दिला आहे. रामा यांच्यावर सप्टेंबरमध्ये जीवघेणा हल्ला झाल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर १८ सप्टेंबर रोजी सात ते आठ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणात पोलिसांनी २१ सप्टेंबर रोजी सराईत गुंड जेनिटो कार्दोझ याच्यासह इतर सात जणांना अटक केली होती. जेनिटोसह इतरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. 

Zenito Cardozo Bail
रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर जेनिटो कार्देझने जामिनासाठी अर्ज केला होता. जेनिटोचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. रामा यांनी देखील त्याला जामीन मिळाला नाही पाहिजे अशी अर्जव न्यायालयासमोर मांडली होती. दरम्यान, अखेर जेनिटोला अटी - शर्तीवर जामीन मिळाला असून, जवळपास अडीच महिन्यानंतर जेनिटो तुरुंगातून बाहेर येणार आहे.

Zenito Cardozo Bail
Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

पूर्ववैमन्यातून मुख्य संशयित जेनिटोने रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  याप्रकरणाला राजकीय किनार असल्याचे देखील सांगितले जाते. दरम्यान, जेनिटो हाच या हल्लाचा मास्टरमाईंड असल्याचा संशय आहे. काणकोणकर यांना करंझाळे येथे अंगावर शेण फेकून बेदम मारहाण केली होती. यात रामा गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com