रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Sawantwadi forest shooting: जंगलात एका रानटी प्राण्याचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने सिप्रियान याने गोळी झाडली दुर्दैवाने ही गोळी सचिनला लागली.
Crime News Maharashtra
Sindudurg, Sawantwadi CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदुर्ग: रानडुक्कराची शिकार करण्यासाठी मित्रांसोबत जंगलात गेलेल्या तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे गुरुवारी (०४ डिसेंबर) उशिरा रात्री ही घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, गोळी झाडणाऱ्या संशयिताला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सचिन मर्गज (२८, रा. सांगेली, सावंतवाडी) असे गोळी लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, सिप्रियान डान्टस (४५, रा. कोलगाव) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. सचिन, सिप्रियान आणि इतर सहकारी ओवळीये जंगलात शिकारीसाठी गेले असता ही धक्कादायक घटना घडली. सिप्रियानने झाडलेली गोळी सचिनच्या छातीजवळ लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Crime News Maharashtra
Dhurandhar Review: क्षणोक्षणी थरार, अभिनयात जोश, क्रूरतेत धार; रणवीर सिंग-अक्षय खन्नासमोर आदित्य धर का ठरतोय 'धुरंधर?'

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, सचिन, सिप्रियान आणि त्याचे सहकारी आवळीये जंगलात शिकारीसाठी गेले होते. रानडुक्कारांचा कळप त्यांनी जंगलात जाताना पाहिला होता. त्यांचाच पाठलाग करत सर्वजण जंगलात गेले होते. दरम्यान, जंगलात एका रानटी प्राण्याचा आवाज आल्याने आवाजाच्या दिशेने सिप्रियान याने गोळी झाडली दुर्दैवाने ही गोळी सचिनला लागली.

गोळी सचिनच्या छातीजवळ लागली व यात खूप रक्तस्त्राव झाल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाला. सचिनच्या वडिलांनी याप्रकरणी सांवतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सचिनच्या मृत्यूला मित्रच कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.

Crime News Maharashtra
Vasco police: सजग पोलिसांमुळे गोवा सुरक्षित! कृष्णा साळकरांची स्तुतीसुमने; वास्को स्थानकात कामगिरीचे कौतुक

सिप्रियानने देखील गोळी झाडल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. सावंतवाडी पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दुसरीकडे बेकायदेशीर शिकारीचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. छुप्या पद्धतीने अवैध शिकार करण्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com