Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

Rama Kankonkar Case: रामा काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी अटक केलेल्या आठ संशयितांना शुक्रवारी सकाळी मेरशी येथील जेएमएफसी न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे.
Rama Kankonkar
Rama Kankonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रामा काणकोणकर यांच्यावरील हल्लाप्रकरणी अटक केलेल्या आठ संशयितांना शुक्रवारी सकाळी मेरशी येथील जेएमएफसी न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. बुधवारी न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीचा अहवाल शुक्रवारी सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे पोलिसांनी नेमका काय तपास पूर्ण केला, वाहन आणि मोबाईल हस्तगत केले का, याचा आज खुलासा होण्याची शक्यता आहे.

...तर आंदोलन चिघळणार

या प्रकरणातील प्रत्येक टप्प्याकडे विरोधी पक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे बारीक लक्ष आहे. पोलिसांच्या तपासात जर चूक किंवा दुर्लक्ष निदर्शनास आले, तर या प्रकरणाचा राजकीय व सामाजिक पातळीवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा विरोधकांनी दिला आहे. पोलिस चौकशीत त्रुटी आढळल्यास आंदोलन पुन्हा चिघळू शकते, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांच्या तपासाकडे सर्वांची नजर

रामा काणकोणकर प्रकरणातील तपासात पोलिसांनी आजपर्यंत काय निष्कर्ष काढले, संशयितांकडून कोणती माहिती मिळवली, घटनास्थळाशी जेनिटोचा संबंध कसा प्रस्थापित केला, याबाबतचा अहवाल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे उद्याचा निकाल केवळ संशयितांच्या कोठडीपुरता मर्यादित नसून संपूर्ण प्रकरणाच्या पुढील दिशेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Rama Kankonkar
Rama Kankonkar: डोळ्यांतून रक्त, कमरेखाली त्राण नाही, शरीरावर मारहाणीच्या खुणा; 7 दिवसानंतर कशी आहे काणकोणकरांची प्रकृती?

काणकोणकर यांना पूर्ण उपचार देण्यास सरकार कटिबद्ध : राणे

रामा काणकोणकर यांना गोमेकॉतून उपचारापूर्वीच घरी पाठवले जाणार, या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आज आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केला. सरकार काणकोणकर यांना पूर्ण उपचार देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी विधानसभा संकुलाबाहेर पत्रकारांना दिली. विधानसभा अधिवेशनात सहभागी होऊन परतताना, काणकोणकर यांना अपूर्ण उपचार असतानाच गोमेकॉतून घरी पाठवले जाण्याच्या शक्यतेकडे पत्रकारांनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.

Rama Kankonkar
Rama Kankonkar: 'जेनिटो घटनास्थळी नव्हताच'! काणकोणकर हल्लाप्रकरणी वकिलांचा दावा; पोलिसांच्या घाईवर प्रश्नचिन्ह

डिस्चार्जबाबत गोंधळ; मात्र मंत्र्यांचा हस्तक्षेप

राणे म्हणाले की, काणकोणकर यांच्या डिस्चार्जबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, मी संबंधित डॉक्टरांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, त्यांना आवश्यक ते सर्व उपचार द्यावेत.

तसेच वैद्यकीय अधीक्षकांना काणकोणकर यांची पूर्ण काळजी घ्यावी व योग्य सुविधा मिळाव्यात अशी सूचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com