सभापतीपदाच्या निवडीसाठी घेतलेल्या विशेष अधिवेशनात रामा काणकोणकर हल्ला प्रकरण गाजले; कोण काय म्हणाले?

Goa Assembly Special Session for Speaker Election: गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असल्याचे मत विरोधी पक्षातील आमदारांनी मांडले.
Goa Assembly Special Session for Speaker Election
Ganesh Gaonkar Elected as speaker of Goa AssemblyDIP - Goa
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यावर राज्यात सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रामा यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा सभापती निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात देखील गाजला. नवीन सभापती गणेश गावकर यांनी काणाकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा, अशी मागणी विरोधी पक्षातील आमदारांनी केली.  

“पूर्वी चालत होते त्याप्रमाणे राजकीय किंवा पक्षपातीपणे सभापतींनी सभागृह चालवू नये. गावकरांनी त्यांचा अनुभव चांगल्या गोष्टी करण्यासाठी वापरावा”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गणेश गावकरांनी शुभेच्छा दिल्या.

तर, “सभापतींनी केवळ सत्ताधाऱ्यांच्या बाजुने उभं राहू नये, आम्ही विरोधी पक्षातील नेते लोकांचे मुद्दे उपस्थित करत असतो, त्यामुळे आम्हालाही समान संधी मिळावी”, असे मत आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी मांडले.

Goa Assembly Special Session for Speaker Election
Goa Assembly New Speaker: 32 विरुद्ध 07 ! गणेश गावकर झाले गोवा विधानसभेचे नवे सभापती, डिकॉस्तांचा पराभव

“राज्यात हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकरांवर अलिकडेच हल्ला झाला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. पूर्वी ज्यापद्धतीने सभापतींनी राजकीय गोष्टीत सहभाग घेतला त्या पद्धतीने होणार नाही अशी खात्री बाळगतो. विरोधकांना देखील बाजू मांडण्यासाठी वेळ मिळेल आणि आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल”, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी देखील गणेश गावकर यांचे अभिनंदन केले. राज्यात आजकाल एसटी समाजाच्या नेत्यांवर हल्ला केला जात आहे त्यांच्या तोंडाला शेण लावले जात आहे. एसटी नेते म्हणून तुम्ही याबाबत भाष्य करायला हवं, असे सरदेसाई म्हणाले.

एसटी समाजासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण मिळेल यासाठी काय करता येईल हे तुमच्या समोरील पहिले आव्हान असेल. विरोधकांना बोलण्याची संधी देण्यात यावी. विकासासाठी विरोधकांनाही सोबत घ्यावे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

Goa Assembly Special Session for Speaker Election
Agni Missile: रेल्वेतून लॉन्च केली शक्तीशाली अग्नि मिसाईल; 2000 KM पर्यंत अचूक लक्ष्यवेध घेण्यास सक्षम, भारताची ताकद वाढली Watch Video

आरजीचे आमदार वीरेश बोरकरांनी रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा मांडत सभापतींनी देखील भूमिका मांडणे महत्वाचे असल्याचे म्हणाले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ला झाला याबाबत ३० मिनिटांच्या चर्चेची मागणी आपचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी केली.

राज्यात सुरु असलेला पर्यावणाचा ऱ्हास आणि अवैध जमीन रुपांतर यामुळे गुंडागिरी वाढल्याचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी नमूद केले.

दरम्यान, सभागृहाच्या नियमांप्रमाणे सभागृह चालवूया. सत्ताधाऱ्यांकडून सभागृहाचे नेते मुख्यमंत्री आणि विरोधकांकडून विरोधी पक्षनेते बाजू मांडत असताना इतरांनी शांतता राखावी. एकावेळी एकानेच मत मांडवे, असे आवाहन यावेळी नवनिर्वाचित सभापती गणेश गावकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com