Agni Missile: रेल्वेतून लॉन्च केली शक्तीशाली अग्नि मिसाईल; 2000 KM पर्यंत अचूक लक्ष्यवेध घेण्यास सक्षम, भारताची ताकद वाढली Watch Video

Intermediate Range Agni-Prime Missile: या चाचणीमुळे भारत ऑन द मूव्ह रेल नेटवर्कवरून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करण्याची क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात सामील झाला आहे
Intermediate Range Agni-Prime Missile Video
Intermediate Range Agni-Prime MissileDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारताने रेल्वे आधारित मोबाईल लाँचर सिस्टीमवरून इंटरमीडिएट रेंज अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. अत्याधुनिक अग्नि क्षेपणास्त्र २००० किमी पर्यंतचा अचूक लक्ष्यवेध घेण्यास सक्षम आहे. इंटरमीडिएट रेंज अग्नि-प्राइम क्षेपणास्त्र विविध प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

विशेष डिझाइन केलेल्या रेल्वे आधारित मोबाईल लाँचरवरून केलेले हे पहिलेच प्रक्षेपण आहे. ग्नि-प्राइम क्षेपणास्त्रामध्ये कमी दृश्यमानतेसह कमी प्रतिक्रिया वेळेत क्रॉस कंट्री मोबिलिटी आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता आहे.

Intermediate Range Agni-Prime Missile Video
Mayem: ‘त्या’ शेतजमिनींबाबत आशा पल्लवीत! मये स्थलांतरित मालमत्ता प्रश्न; मालकी हक्कासाठी 130 अर्ज

इंटरमीडिएट रेंज अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीबद्दल देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ इंडिया, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आहे.

या यशस्वी चाचणीमुळे भारत ऑन द मूव्ह रेल नेटवर्कवरून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करण्याची क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात सामील झाला आहे, असे राजनाथ यांनी म्हटले आहे.

इंटरमीडिएट रेंज अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची ही चाचणी ओडिशातील चांदीपूर इंटिग्रेटेड टेस्ट रेंज येथे घेण्यात आली. भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (SFC) साठी डिझाइन केले आहे. पूर्वी, क्षेपणास्त्रे निश्चित ठिकाणांवरून डागली जात असत, परंतु हे लाँचर शत्रूची दिशाभूल करु शकते. रेल्वेवरून दूरच्या लक्ष्यावर डागण्याच्या क्षमतेमुळे भारताच्या क्षेपणास्त्र क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com