

पणजी: आयोध्यातील राम मंदिर ट्रस्टमध्ये देणगीच्या झालेल्या चोरीच्या अनुषंगाने आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
त्याचबरोबर केंद्र सरकार या कथित देणगी चोरीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करत, या चोरीप्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाईची मागणी त्यांनी केली.
दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर केजरीवाल आले असून, बांबोळी येथील हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी ते बोलत होते. याप्रसंगी गोवा प्रभारी आतिषी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
केजरीवाल म्हणाले, राम मंदिर प्रकल्पाच्या संदर्भात चोरी, मंदिराच्या ट्रस्टसाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीत फुगवून दर दाखवून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. भाजप राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी प्रभू श्रीरामाच्या नावाचा वापर करत आहे.
आयोध्येतील श्री राम मंदिर हे कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने, कथित अनियमिततेविरुद्ध प्रत्येक सनातनी व्यक्तीने आवाज उठवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. ४० दिवसांत ७० वेळा चोरी करण्याचे सीसीटीव्ही फुटेज दिसून आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.