Goa Tata Power Contract: वीज वितरणाचे कंत्राट 'टाटा पाॅवर'ला देण्यास विरोध; मुख्यमंत्री, वीजमंत्र्यांनी खुलासा करण्याची विजय सरदेसाई यांची मागणी

Goa Electricity Distribution: सरकारने गोव्यात हजारो कोटी रुपये खर्चून वीजपुरवठ्यासंदर्भातील साधनसुविधा उपलब्ध केल्या आहेत.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: सरकारने गोव्यात हजारो कोटी रुपये खर्चून वीजपुरवठ्यासंदर्भातील साधनसुविधा उपलब्ध केल्या आहेत. मात्र, राज्यातील वीजग्राहकांना वीज वितरण करण्याचे कंत्राट टाटा पाॅवर कंपनीला देण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप होत आहे. हे खरे असल्यास मुख्यमंत्री आणि वीजमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी मडगाव येथे केली.

सध्या राज्यातील भाजप सरकार ज्या पद्धतीने काम करीत आहे, ते पाहता या सरकारचा प्रत्येक निर्णय संशयास्पद वाटू लागला आहे. विरोधी पक्षांतही सध्या ऐक्य नसल्याचे जाणवत असल्याने त्याचा फायदा सत्ताधारी पक्ष घेताना दिसत आहे, असे सरदेसाई म्हणाले.

गुरुवारी मडगावातील प्रोव्हिदोरिया चालवीत असलेल्या नूतनीकरण केलेल्या वृद्धाश्रमाची पाहणी सरदेसाई यांनी केली. तसेच तेथील वृद्धांना फळांचे वाटप केले.

Vijai Sardesai
Goa Weather: राज्यात पावसाचा धडाका कायम; फोंड्यात सर्वाधिक वर्षाव, पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'; लवकरच तूट भरून निघणार

मे महिन्यात सर्व पंचायतींना पत्रे...

टाटा पाॅवर कंपनीने मे महिन्यात सर्व पंचायतींना ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करण्याबाबत पत्रे पाठविली होती. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. याविरोधात यापूर्वीच आवाज उठवायला हवा होता. सरकारही याबाबत गप्प असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

Vijai Sardesai
Goa Yellow Alert: गोव्यात पुढचे 7 दिवस मुसळधार; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी! VIDEO

सरदेसाई यांच्या म्हणण्यानुसार, वीज खात्याच्या मुख्य वीज अभियंत्यांचाही या प्रस्तावाला विरोध असल्याचे आपल्याला समजले आहे. तरीही संयुक्त वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसार वीज वितरणाचे कंत्राट टाटा पाॅवरला देण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com