Goa Agriculture: आठवडाभराच्या दमदार पावसानं बळीराजा सुखावला! शेतीकामांना वेग; कृषी उपसंचालकांकडून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Goa Farming News: राज्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते; मात्र त्यानंतर मान्सून मंदावल्याने शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग दाटले होते.
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले होते; मात्र त्यानंतर मान्सून मंदावल्याने शेतकऱ्यांपुढे चिंतेचे ढग दाटले होते. परंतु गेल्या आठवडाभरापासून राज्यात मुबलक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

पावसामुळे रोपणी तसेच इतर शेतीकामांना आता कोणतीही अडचण नसल्याचे कृषी उपसंचालक दत्तप्रसाद देसाई यांनी सांगितले. पावसामुळे राज्यातील शेतकरी शेतीकामांमध्ये जोमाने गुंतले आहेत. पुरेसा पाऊस झाल्यामुळे यंदा खरिपाचे पीक उत्तम येईल, अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील विभागीय कृषी कार्यालयाशी संपर्क साधून चालू हंगामातील योजनांची माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

Goa Agriculture
Goa Tata Power Contract: वीज वितरणाचे कंत्राट 'टाटा पाॅवर'ला देण्यास विरोध; मुख्यमंत्री, वीजमंत्र्यांनी खुलासा करण्याची विजय सरदेसाई यांची मागणी

शेतीसाठी आवश्यक बियाणे तसेच खत उपलब्ध असून, बियाण्यावर ५० टक्के अनुदान दिले जाते. तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना खतांवर अनुदान मिळते; त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन देसाई यांनी केले.

Goa Agriculture
Goa Weather: राज्यात पावसाचा धडाका कायम; फोंड्यात सर्वाधिक वर्षाव, पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'; लवकरच तूट भरून निघणार

आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करा

केवळ चांगल्या पावसावर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणात पीक मिळवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.

मुबलक पावसामुळे यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी खाते शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास सज्ज असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com