Goa Rajyasabha Election: खा. विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मुदत 'या' दिवशी संपणार; 23 जुलैला निवडणूक शक्य

गोव्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी 'या' नावाची चर्चा
Goa Rajyasabha Election 2023
Goa Rajyasabha Election 2023Dainik Gomantak

Goa Rajyasabha Election 2023: गोव्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले भाजपचे खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता गोव्यातून कोण जाणार? भाजपमधून राज्यसभेसाठी कुणाला संधी मिळणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

गोव्यातून लोकसभेत दोन तर राज्यसभेत एक खासदार निवडून जातो. पैकी उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर भाजप नेते विनय तेंडुलकर हे गोव्यातले राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत.

Goa Rajyasabha Election 2023
Mauvin Godinho : मोपा विमानतळावर लवकरच ब्लू टॅक्सी सेवा; चालकांना वाहतूक, वागणूक प्रशिक्षण बंधनकारक

खासदार विनय तेंडुलकर यांचा राज्यसभेचा 6 वर्षांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. 31 जुलै 2017 रोजी ते राज्यसभेवर निवडून गेले होते. तेंडुलकर यांची खासदारकीची मुदत येत्या 28 जुलै रोजी संपत आहे.

म्हणजेच केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तेंडुलकर यांच्यानंतर गोव्यातून राज्यसभेवर भाजपकडून कुणाची वर्णी लागणार, याची चर्चा आता गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गोव्यातील राज्यसभेच्या जागेसाठी 23 जुलै रोजी निवडणूक होऊ शकते. दरम्यान, गोवा विधानसभेत भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून येणार हे नक्की आहे.

तथापि, तेंडुलकर यांच्यानंतर भाजपमधून कोण याचीच उत्सुकता असणार आहे. यात भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे समजते.

Goa Rajyasabha Election 2023
म्हापसा-गिरी रस्त्यावर पडलेल्या भगदाडाचे काम अपूर्णच; 'साबांखा'च्या कामावर स्थानिकांची नाराजी

खा. विनय तेंडुलकर हे राज्यसभेवर पुन्हा जाण्यासाठी इच्छूक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना या जागेवर संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तेंडुलकर हे देखील खासदार होण्यापुर्वी प्रदेशाध्यक्षच होते.

पुन्हा प्रदेशाध्यक्षांना संधी मिळणार?

राज्यसभेवर निवडून जाण्यापुर्वी विनय तेंडुलकर हे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. 2012 ते 2020 असे सलग दोन टर्म त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. तेंडुलकर राज्यसभेवर निवडून गेल्यावर तीन वर्षांनी 12 जानेवारी 2020 रोजी सदानंत शेट तानावडे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले.

तानावडे यांचे राज्यातील सर्व भाजप नेत्यांची उत्तम संबंध आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह या नेत्यांची त्यांना उत्तम साथ मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com