Rajnath Singh Goa Visit: संरक्षणमंत्री राजनाथ सिंग मंगळवारी गोव्यात, पत्रादेवी-कोलवाळ मार्गावर कडेकोट बंदोबस्‍त; अवजड वाहनांना 'नो-एन्ट्री'!

Rajnath Singh Goa Visit August 25: संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्‍या २५ ऑगस्टच्‍या गोवा दौऱ्यादरम्‍यान राष्‍ट्रीय महामार्गावरील पत्रादेवी ते कोलवाळपर्यंत कडेकोट बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार आहे.
Rajnath Singh Goa Visit August 25
Rajnath Singh Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्‍या २५ ऑगस्टच्‍या गोवा दौऱ्यादरम्‍यान राष्‍ट्रीय महामार्गावरील पत्रादेवी ते कोलवाळपर्यंत कडेकोट बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार आहे. सिंग यांच्‍या ताफ्‍यात अडथळा येऊ नये, यासाठी अवजड व्‍यावसायिक वाहनचालकांना २५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या कालावधीत वाहने महामार्गालगत उभी करून ठेवावी लागतील. परंतु, हा नियम प्रवासी बसगाड्यांसाठी लागू असणार नाही.

उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी अंकित यादव यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. पेडणे तालुक्यातील नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे तसेच संग्रहालयाचे उद््घाटन २५ रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्‍या हस्‍ते होणार आहे.

Rajnath Singh Goa Visit August 25
Goa BJP: प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांना दिल्लीत सादर केला अहवाल; भाजपचे निवडणूक धोरण रविवारी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍यासह इतर मंत्री, स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देणे आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्‍याच्‍या उद्देशाने पत्रादेवी हुतात्‍मा स्‍मारकाचे नूतनीकरण करण्‍याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. हे काम पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com