Bull Attack in Majorda: माजोर्डा येथे बैलाच्या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू, काहीजण जखमी; कोलवा पोलिसांकडून तपास सुरु

Bull Attack Death: माजोर्डा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बैलाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
Bull Attack Death
Bull Attack in MajordaDainik Gomantak
Published on
Updated on

Majorda Bull Attack: माजोर्डा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे बैलाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत. बैलांच्या झुंजीसाठी बैलाला आणण्यात आल्याचा संशय आहे, मात्र झुंज झाली नाही.

दरम्यान, बैलाच्या हल्ल्यात राजेश निस्तानी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काहीजण जखमी झाले. त्यानंतर तात्काळ जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

माजोर्डा येथील एका निर्जन शेतात (Farm) बैलांची झुंज होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासाठीच बैलाला येथे आणण्यात आले होते. त्याचवेळी, ही धक्कादायक घटना घडली. बैलांच्या झुंजीचा खेळ गोव्याच्या काही भागात पारंपारिक मानला जातो, पण तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

Bull Attack Death
Majorda Overbridge Project: माजोर्डातील उड्डाण पूल योजना मंजूर! वाहनांसह दुचाकी, पादचाऱ्यांसाठी खास सोय; आलेक्स सिक्वेरांची माहिती

अचानक घडली घटना

याच हल्ल्यात राजेश निस्तानी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले अन्य काहीजण या हल्ल्यात जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही घटना इतकी अचानक घडली की कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Bull Attack Death
Valpoi: वाळपईत 100 कोटींचे प्रकल्प मार्गावर! पर्ये, होंडा येथील कामे हाती; आरोग्यमंत्री राणे

पोलिसांचा तपास आणि 'धीरियो'चा संशय

या घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली. या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा गोव्यातील बेकायदेशीर बैलांच्या झुंजीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या प्रकरणातील पुढील तपशील पोलीस तपासाअंती समोर येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com