Majorda Overbridge Project: माजोर्डातील उड्डाण पूल योजना मंजूर! वाहनांसह दुचाकी, पादचाऱ्यांसाठी खास सोय; आलेक्स सिक्वेरांची माहिती

New Bridges In Majorda Goa: माजोर्डा येथे रेल्वेमार्ग ओलांडतात वाहनांसाठी उड्डाण पूल, पादचाऱ्यांसाठी पूल व दुचाकीसाठी पूल असे तीन लहान प्रकल्प उभे राहणार आहेत.
Majorda Overbridge Project: माजोर्डातील उड्डाण पूल योजना मंजूर! वाहनांसह दुचाकी, पादचाऱ्यांसाठी खास सोय; आलेक्स  सिक्वेरांची माहिती
Aleixo SequeiraDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: माजोर्डा येथे रेल्वेमार्ग ओलांडतात वाहनांसाठी उड्डाण पूल, पादचाऱ्यांसाठी पूल व दुचाकीसाठी पूल असे तीन लहान प्रकल्प उभे राहणार आहेत, अशी माहिती पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली आहे. या तिन्ही लहान योजनांना मान्यता मिळाली आहे, असे त्याने स्पष्ट केले. या तिन्ही योजनांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम रेल विकास निगम लिमिटेडतर्फे केले जाणार आहे. सध्या रेल विकास निगम लिमिटेड रेल्वे मार्गाच्या दुपदरी कामात गुंतले आहे. त्यामुळे हे कामसुद्धा करणे त्यांना शक्य होणार आहे असे निगमच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकदा का हे तिन्ही प्रकल्प पूर्ण झाले की माजोर्डा येथील फाटक कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कोंब येथील मारुती मंदिराजवळ असलेल्या रेल्वे फाटकामुळे लोकांना भयंकर त्रास सोसावे लागत आहे. या परिसरात शाळा व महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात. तेथे रेल्वे मार्गाखालून रस्ता करण्यात आला आहे, पण पावसाळ्यात तेथे पाणी भरलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी दूरवरून वळसा घालून जावे लागते.

Majorda Overbridge Project: माजोर्डातील उड्डाण पूल योजना मंजूर! वाहनांसह दुचाकी, पादचाऱ्यांसाठी खास सोय; आलेक्स  सिक्वेरांची माहिती
Majorda Shacks: माजोर्डा येथे मुसळधार पाऊस; शॅक्सना मोठा फटका!

मडगावचे आमदार दिगंबर कामत यानी आपण कोंब येथे उड्डाण पुलासाठी प्रयत्न करीत असल्याचे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. रेल विकास निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार राज्य सरकार या उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ता व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामार्फत प्रयत्न करीत आहे.

Majorda Overbridge Project: माजोर्डातील उड्डाण पूल योजना मंजूर! वाहनांसह दुचाकी, पादचाऱ्यांसाठी खास सोय; आलेक्स  सिक्वेरांची माहिती
Majorda Junction: रेल्वे कामामुळे माजोर्डा नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

कोंब येथे उड्डाण पूल कधी?

कोंब ते रेल्वे स्थानकपर्यंतचा रेल्वेमार्ग हा कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाराखाली येत असल्याने कोंब उड्डाण पुलाचा निर्णय कोकण रेल्वेने (Konkan Railway) घ्यायचा आहे. मात्र, कोंब उड्डाण पुलासाठी अजूनही प्रस्ताव आलेला नसल्याचे कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या उड्डाण पुलासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन प्रस्ताव दिल्यास त्याचा विचार होऊ शकते अशी पुस्तीही महामंडळाचे अधिकारी जोडतात. विद्यार्थी व नागरिकांच्या हितासाठी कोंब येथे उड्डाण पूल होणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com