Valpoi: वाळपईत 100 कोटींचे प्रकल्प मार्गावर! पर्ये, होंडा येथील कामे हाती; आरोग्यमंत्री राणे

Vishwajit Rane: पर्येत पुढील दोन वर्षांत १६ कोटींचे प्रकल्प पूर्ण केले जातील, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. होंडा येथेही प्रकल्प हाती घेतले आहेत.
Vishwajit Rane, Valpoi Development
Vishwajit Rane, Valpoi Development Dainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: मासोर्डेच्या मैदानासाठी साडेतीन कोटी खर्च केले. होंडा येथेही प्रकल्प हाती घेतले आहेत. वाळपईचा मास्टर प्लॅन तयार करून कामे हाती घेतली आहेत. वाळपई भागात १०० कोटींचे प्रकल्प मार्गावर आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

गोवा स्टेट अर्बन विकास एजन्सीतर्फे (जीसुडा) वाळपई नगरपालिकाअंतर्गत वाळपई पालिका क्षेत्रातील मासोर्डे येथे बांधण्यात आलेल्या नैसर्गिकपणे हिरवळ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील फुटबॉल मैदानाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात आरोग्यमंत्री बोलत होते.

यावेळी पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे, वाळपई नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर, नगरसेवक शेहझीन शेख, अनिल काटकर, वसुउद्दीन सय्यद, सय्यद सरफराज, इद्रूस शेख, शराफत खान, निर्मला साखळकर, विनोद हळदणकर, समाजकार्यकर्ते विनोद शिंदे, खात्याचे संचालक ब्रिजेश मणेरकर, प्रकल्प अधिकारी अंकुश गावकर, प्रकल्प अभियंता हुसेन शहा मुझावर, वाळपई पालिका मुख्याधिकारी धिरेन बाणावलीकर, मुन्ना आदींची उपस्थिती होती.

यावेळी शॉर्ट फिल्मद्वारे उद्‌घाटन केलेल्या मासोर्डे मैदानाबरोबरच सध्या हाती घेण्यात आलेल्या वाळपईतील छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानाच्या कामाचे व नाणूस म्हशीचे मळ येथील आधुनिक पद्धतीच्या सर्व सुविधांनीयुक्त अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट स्टेडियमच्या कामाची माहिती देण्यात आली. विश्वजीत राणे व डॉ. दिव्या राणे यांनी मैदानाचे उद्‌घाटन केले.

दरम्यान, नाणूस येथील म्हशीचे मळ क्रिकेट स्टेडियमचे काम सुरू असून येत्या वर्षभरात २५ डिसेंबरपर्यंत उद्‌घाटन करण्यात येईल. सत्तरीच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पर्येत पुढील दोन वर्षांत १६ कोटींचे प्रकल्प पूर्ण केले जातील, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane, Valpoi Development
Valpoi News: वाळपईत प्राण्यांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई; दोघांना अटक

आम्ही कधीच भेदभाव केला नाही

प्रत्येक धर्माला मान दिला पाहिजे. आम्ही कधीच भेदभाव केला नाही. महाराष्ट्रातही महिलांनी मोठे परिवर्तन केले. लोकांच्या चुलीपर्यंत काम करणारे भाजप सरकार आहे. मंदिर, अंगणवाडी, लोकांना विविध प्रकारची नुकसानभरपाई, असे समाजकार्य केले आहे.

गोव्यात तालुका क्षेत्रातील इस्पितळात डायलेसिस सुविधा मिळत आहे. कॅन्सरशी लढण्यास महिलांसाठी शिबिरे घेतली जातात. त्याचा लाभ घेतला पाहिजे. कॅन्सरचे वेळेत निदान झाले तर उपचार करण्यास मदत होते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Vishwajit Rane, Valpoi Development
Valpoi: बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा! वाळपईतील संतापजनक प्रकार

मासोर्डे-सत्तरी येथील श्री शांतादुर्गा महादेव देवस्थानच्या सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन आज बुधवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाळपई पालिका नगराध्यक्ष प्रसन्ना गावस, उपनगराध्यक्ष रामदास शिरोडकर, नगरसेवक शेहझीन शेख, अनिल काटकर, शराफत खान, इद्रूस शेख, वसुउद्दीन सय्यद, सय्यद सरफराज, निर्मला साखळकर, विनोद हळदणकर, सूर्यकांत गावस, विनोद शिंदे, विनय गावस आदींची उपस्थिती होती. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन केले. राणे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला असून सुमारे ८० लाख ते १ कोटीपर्यंत यासाठी खर्च केले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com