Goa Monsoon Update: पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली असून गेल्या महिन्याभरात केवळ राज्यात 10 इंच पाऊस पडला आहे. सध्या राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला असला तरी अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाने कूर्मगतीने 110 इंचांचा टप्पा गाठला आहे.
जुलै महिन्यात रिकॉर्ड ब्रेक बरसलेल्या पावसाची नंतर गती मंदावली आहे. राज्यात १२ ऑगस्ट रोजी पावसाचे शतक पूर्ण झाले होते, त्यानंतर १० इंच पाऊस पूर्ण व्हायला २६ दिवस लागले. राज्यात आतापर्यंत एकूण २८०२.८ मि.मी. (११० इंच) पावसाची नोंद करण्यात आली असून सरासरीपेक्षा १ टक्का अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील मुरगाव आणि दाबोळी केंद्र वगळता सर्व केंद्रांवर १०० इंचाहून अधिक पाऊस पडला असून सर्वाधिक १२४ इंच पाऊस सांगेत बरसला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.