पावसाच्या व्यत्ययामुळे तिळारीच्या दुरुस्तीत अडथळा

अधिकाऱ्यांकडून पाहणी, मशीनरी दाखल
Tilari Canal: फुटलेल्या  कालव्याची पाहणी करताना अधिकारी
Tilari Canal: फुटलेल्या कालव्याची पाहणी करताना अधिकारी दैनिक गोमन्तक
Published on: 
Updated on: 

Bicholim: मणेरी-दोडामार्ग (Maneri-Dodamarg) येथे भगदाड पडलेल्या ठिकाणी तिळारी कालव्याच्या (Tilari Canal) दुरुस्ती कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरवात झालेली नसून, पावसामुळे दुरुस्तीकाम लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. आजपासून युद्धपातळीवर दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले होते. भगदाड पडलेल्या ठिकाणी तिळारी प्रकल्प विभागातर्फे यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र पावसाच्या अडथळ्यामुळे आज (सोमवारी) काम हाती घेण्यात अडसर निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे. पावसाने कृपा केल्यास सध्या उपलब्ध आहे, ती यंत्रसामग्री वापरून उद्या (मंगळवारी) कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Tilari Canal: फुटलेल्या  कालव्याची पाहणी करताना अधिकारी
मंदिर शुशोभिकरणामुळे साखळीच्या सौंदर्यांत भर: मुख्यमंत्री सावंत

पावसाचा व्यत्यय

महाराष्ट्र आणि गोवा राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारीच्या डाव्या बाजूच्या मुख्य कालव्याला काल (रविवारी) पहाटे दोडामार्ग तालुक्यातील धनगरवाडी-मणेरी येथे भगदाड पडल्याने या कालव्यातील पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तिळारीतून दोडामार्गसह गोव्यात होणारा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला आहे. कालव्याची दुरुस्ती होईपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

दोडामार्ग तसेच गोवा राज्यात होणारा पाणीपुरवठा बंद झाल्याने तातडीने सोमवारी तिळारी जलसंपदा विभागाने यांञिकी विभागाचे जेसीबी मशीन आणून ठेवले आहे. परंतु सोमवारी दुपारी दोडामार्ग तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करता आले नाही. दरम्यान,एक-दोन दिवसात चिपळूण येथून मोठे पोकलीन मशीन घटनास्थळी दाखल होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

Tilari Canal: फुटलेल्या  कालव्याची पाहणी करताना अधिकारी
परतीच्या पावसामुळे रगाडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

अधिकाऱ्यांकडून पाहणी

दरम्यान कालवा फुटला त्याठिकाणी सोमवारी सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेलकर, तहसीलदार अरुण खानोलकर, प्रांत‌अधिकारी प्रशांत पानवेलकर, तहशीलदार अरुण खानोलकर,सर्कल अधिकारी राजन गवस, तसेच तिळारी जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी फुटलेल्या कालव्याची पाहणी केली. तसेच कालव्याला कुठे कुठे धोका आहे याची पाहणी करून, त्याचीही दुरुस्ती करावी. अशी सुचना केली. जवळपासच्या शेती-बागायतीत साचलेला गाळ काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com