Sankhalim: राधाकृष्ण मुरलीधर संस्थानच्या सौदर्यिकरणाचे फित कापून उदघाटन करताना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व इतर मान्यवर
Sankhalim: राधाकृष्ण मुरलीधर संस्थानच्या सौदर्यिकरणाचे फित कापून उदघाटन करताना मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व इतर मान्यवरदैनिक गोमन्तक

मंदिर शुशोभिकरणामुळे साखळीच्या सौंदर्यांत भर: मुख्यमंत्री सावंत

साखळी राधाकृष्णा मुरलीधर संस्थानच्या सौदर्यिकरणाचे उदघाटन
Published on

Sankhalim: राधाकृष्ण मंदीर (Radhakrishna Temple Sankhalim) सौंदर्यिकरणामुळे साखळी शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. साखळी शहरात पर्यटकांमध्ये वाढ होणार, असे उदगार मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी काढले. सुमारे साडेचार कोटी खर्चून गोवा पर्यटन खाते (Goa Tourism) व गोवा पर्यटन महामंडळातर्फे (Goa Tourism Corporation) साखळी येथील राधाकृष्ण मुरलीधर संस्थानचे सौंदर्यिकरण करण्यात आले. त्याच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पाळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopate), संचालक दिपराज प्रभू, राजन कडकडे, ए.जी. देविदास पांगम, साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल काणेकर आदींची उपस्थिती होती.

साखळी येथील राधाकृष्ण मुरलीधर मंदिरामध्ये  मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व इतर मान्यवर
साखळी येथील राधाकृष्ण मुरलीधर मंदिरामध्ये मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत व इतर मान्यवरदैनिक गोमन्तक

साखळीत अनेक अपुर्ण विकासकामे आपण आपल्या कारकिर्दीत पुर्ण केली. तसेच नवीन प्रकल्प आणले. भविष्यात साखळी येथील रुद्रेश्वर देवस्थानचेही सौदर्यिकरण करणार, होंडा ते साखळी हॉस्पिटल रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरण करणार. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.सावंत यांनी दिली.पर्यटन महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यावेळी बोलताना म्हणाले डॉ. सावंत एक यशस्वी मुख्यमंत्री तळमळीने दिवसरात्र काम करीत आहे. दुरदृष्टी व सकारात्मक गुणांमुळे ते गोव्याची धुरा सांभाळण्यात यशस्वी ठरले आहेत. कोविड काळही त्यांनी चांगल्या रितीने हाताळला.

साखळी येथील राधाकृष्ण मुरलीधर संस्थानच्या सौदर्यिकरण
साखळी येथील राधाकृष्ण मुरलीधर संस्थानच्या सौदर्यिकरणदैनिक गोमन्तक

स्वागत व प्रास्तविक देवस्थान समितीचे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी केले. संचालक राजन कडकडे यांनीही विचार मांडले. प्रकल्प प्रमुख प्रमोद बदामी यांनी या प्रकल्पा बद्दल माहिती. यावेळी देवस्थान समितीतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा श्रीफळ, शाल व मुर्ती देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मळीक चंदगडकर यांनी तर प्रियेश डांगी यांनी आभार प्रदर्शन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com