परतीच्या पावसामुळे रगाडा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

पैकुळ गावात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून मुरमुणे येथे उभारलेला पादपूल देखील पाण्याखाली
Sattari: रगाडा नदिची पाण्याची पातळी वाढल्यामुळे  पैकुळ येथे उभारण्यात आलेल्या पादपूल धोकादायक बनला आहे.
Sattari: रगाडा नदिची पाण्याची पातळी वाढल्यामुळे पैकुळ येथे उभारण्यात आलेल्या पादपूल धोकादायक बनला आहे. Dainik Gomantak

Sattari: आज दुपार पासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सत्तरी (Sattari) तालुक्यातील नद्या-नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आहे. रगाडा नदीची (Ragada river) पाण्याची पातळी वाढल्यामुळे पैकुळ गावात जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पैकुळ (ठाणे)भागातील व मुरमुणे येथील बंधाऱ्यावर उभारलेला पादपूल पाण्याखाली (Pool under water) गेला. यामुळे या पूलावरुन चालत जाणे धोक्याचे बनल्याने त्यांवरून न जाता नदिचं पाणी कमी होईस्तोवर त्या ठिकाणी थांबून नंतर पैकुळवासीयांनी गाव गाठला असे या ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी सांगितले.

Sattari: रगाडा नदिची पाण्याची पातळी वाढल्यामुळे  पैकुळ येथे उभारण्यात आलेल्या पादपूल धोकादायक बनला आहे.
तेरेखोल आणि शपोरा नदीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा होत आहे;पाहा व्हिडिओ

23 जुलै रोजी आलेल्या महापुरात पैकुळ सत्तरी येथील रगाडा नदीवरील पूल कोसळल्या मुळे पैकुळ गावातील नागरिकांचा गुळेली भागाशी संपर्क तुटला होता.बोंडला मार्गे असलेल्या कच्च्या रस्त्याचा वापर करत पैकुळ वास गुळेली व अन्य ठिकाणी जात होते . मध्यंतरी पैकुळ वासायांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची भेट घेऊन गावाला भेडसावणारी समस्या सांगितल्यावर आरोग्य मंत्री राणे यांच्या प्रयत्नातून जलसिंचन खात्यातर्फे रगडा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर प्लेट घालून किमान चालून तरी जाता यावे या उद्देशाने बंधाऱ्यावर प्लेट घालून पर्यायी पदपूल उभारला होता. त्याचा वापर सध्या या भागातील नागरिक करीत आहेत.

Sattari: रगाडा नदिची पाण्याची पातळी वाढल्यामुळे  पैकुळ येथे उभारण्यात आलेल्या पादपूल धोकादायक बनला आहे.
मोपा विमानतळ पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईन: खासदार ओब्रायन

दरम्यान आज पडलेल्या पावसाप्रमाणे जर पाऊस पडला तर ह्या उभारलेल्या पदपूलावरुन प्रवास करणे धोक्याचे बनणार आहे. सरकारने या दृष्टीने लवकरात लवकर निर्णय घेणे जरुरीचे असून पैकुळ पूल उभारण्याची कार्यवाही लवकरात पूर्ण करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com