महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत गोमंतकीय सुपूत्राचा सन्मान

राहुल नार्वेकर यांचे मिरामारला घर तसेच शांतादुर्गा कुलदेवता; शिंदेनी जिंकली पहिली लढाई
 MLA Rahul Narwekar
MLA Rahul NarwekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिवसेना बंडखोराच्या सहकार्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने विधानसभा सभागृहात लोकतांत्रिक पध्दतीची पहिली लढाई आज जिंकली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आज आणि उद्या असे दोन दिवसीय विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूळ गोमंतकीय सुपूत्राचा सन्मान झाल्याचे पहायला मिळाले. ( Rahul Narwekar native of Goa, has been elected as the Speaker of the Maharashtra Legislative Assembly )

 MLA Rahul Narwekar
बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटात खलबतांना वेग

अध्यक्षपदी नव्या गटाचे राहुल नार्वेकर हे 57 मतांनी विजयी झाले. राहुल नार्वेकर यांनी 164 तर विरोधी शिवसेनेच्या राजन साळवी यांना 107 मते मिळाली. नार्वेकर हे मूळ गोमंतकीय सुपूत्र आहेत.

आज विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कामकाज पटलावर अध्यक्षपदाची निवड हा मुख्य अजेंडा होता. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली. यानंतर नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार करत सहजपणे अध्यक्षपद जिंकले. या आधी आवाजी मतदान आणि नंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली.

 MLA Rahul Narwekar
कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर ?

शांतादुर्गा कुलदेवता आणि मिरामारला घर

महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मूळ गोमंतकीय असून नार्वे येथील श्री कणकेश्‍वरी शांतादुर्गा ही त्यांची कुलदेवता आहे. दरवर्षी कुलाचार आणि आशीर्वादासाठी ते या देवीच्या दर्शनाला येतात. त्यांचे मिरामार येथे घर असून तिथेही ते वारंवार भेटीसाठी येत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

राहुल नार्वेकर यांचे वडील कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांचा प्रवास एक शिवसैनिक ते विधानसभा अध्यक्ष असा राहिला आहे. याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य होते. सध्या भाजपकडून कुलाबा येथून विधानसभेवर निवडून आले आहेत.

शिंदे सरकारची उद्या खरी कसोटी

उद्या म्हणजेच सोमवारी 8 जून रोजी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. यानंतर सरकार स्थापन केल्या केल्या लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com