बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिंदे गटात खलबतांना वेग

बहुमत चाचणीसंदर्भात भाजपा-शिंदे गटाची संयुक्त बैठक
BJP AND MLa
BJP AND MLa Dainik Gomantak

गेले काही दिवस महाराष्ट्रात सुरु असलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी आता थंडावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप आणि समर्थक आमदारांनी ज्या कारणासाठी बंड पुकारले होते. ती बाब उद्याच निकाली निघणार आहे. कारण उद्या दिनांक 8 जून रोजी राज्यपालांच्या आदेशानुसार विधानसभेत सर्व विधानसभा सदस्यांना बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ( BJP and shinde group MLA meeting about floor test IN vidhansabha )

BJP AND MLa
कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर ?

आज विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना 164 मतं मिळाली असून त्यांनी विजयी जल्लोष केला आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाची ही पहिली परीक्षा होती, यानंतर आता बहूमताची चाचणी द्यावी लागली आहे.

BJP AND MLa
'मुस्लिम शहरांची नावे बदलून काय होणार?' सपा नेते अबू आझमींचा ठाकरेंना सवाल

या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाची संयुक्त बैठक मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या बैठकीला बहुमत चाचणीला सामोरे जाताना काय रणनीती असायला हवी, काय नवे धोरण असणार आहे. याबाबत खलबते सुरु असणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला भाजपाचे आणि शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. तर या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते दीपक केसरकर आमदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com