महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडलं असून या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने घेतलेल्या निर्णायानुसार मतदान केले आहे. त्यामूळे अपेक्षित निकाल पदरात पडला आहे. भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आहे. हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात विस्ताराने ( Maharashtra vidhan sabha speaker election 2022 BJP candidate Rahul Narvekar )
राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि अपक्ष असे एकूण 164 मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेल्या राजन साळवी यांना 107 इतकी मते मिळाली. त्यामूळे या सत्ता स्थापनेनंतर तरी महाराष्ट्रातील वेगाने सुरु असलेल्या राजकिय घडामोडी आता तरी थांबतील का ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात तयार झाला आहे.
राहुल नार्वेकर यांची राजकीय कारकिर्द
राहुल नार्वेकर हे मुंबईतून भाजपचे आमदार आहेत. नार्वेकर या आधी शिवसेनेत होते, परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने शिवसेनेने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
राष्ट्रवादीत प्रवेश करताच राहुल नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून 2016 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. आणि सध्या ते भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा मतदार संघातून आमदार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.