Goa CM Vs Congress: कुत्रा, बिस्किट प्रकरण! सावंतांची राहुल गांधींवर टीका, काँग्रेस म्हणते डॉक्टर वायफळ बडबड थांबवा!

Goa CM Vs Congress: मंगळवारी चिंबल येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
Goa CM Pramod Sawant Vs Congress
Goa CM Pramod Sawant Vs CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa CM Vs Congress

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यात सध्या संकल्प पत्र अभियान राबवत असून, जनतेच्या समस्या ऐकूण घेत आहेत. मंगळवारी चिंबल येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

भारत जोडो न्याय यात्रेत पाळीव कुत्र्याने खाण्यास नकार दिलेले बिस्किट पक्षाच्या कार्यकर्त्याला दिल्याचा आरोप मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला.

चिंबल येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत यांनी भारत जोडो न्याय यात्रेतील एका घटनेचा संदर्भ दिला. वाहनावरुन प्रवास करताना सभोवताली जमलेल्या लोकांना पाहून राहुल गांधी यांचा पाळीव कुत्रा भुंकायला लागला. कुत्र्याला शांत करण्यासाठी त्यांनी त्याला बिस्किट दिले, कुत्र्यानं बिस्किट खाण्यास नकार दिल्याने तेच बिस्किट त्यांनी कार्यकर्त्याला दिले, असे सावंत म्हणाले.

यावेळी गोवा भाजप प्रभारी आशिष सूद, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि आमदार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान करत नाही, असेही सावंत यावेळी म्हणाले.

Goa CM Pramod Sawant Vs Congress
Goa Police: लोकसभा निवडणूक आचारसंहिता! गोवा पोलिसांकडून कडक तपासणी, उत्तरेत 17 गुन्हे दाखल

लुटारू आणि दरोडेखोरांवर कुत्रे भुंकतात. भाजप सरकारने गेल्या 11 वर्षात गोव्यातील सरकारी तिजोरी आणि जनादेश लुटला, म्हणूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निष्ठावंत आणि विश्वासू प्राणी कुत्र्याबद्दल द्वेष आहे.

राहुल गांधी यांचे गोव्यातील कुत्र्यांवर प्रेम आहे याचा आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर वायफळ बडबड थांबवा!, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानावर काँग्रेसने टीका केली.

Goa CM Pramod Sawant Vs Congress
पेडणे, बार्देशमधील वीज ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, ...अन्यथा वीज कनेक्शन तोडले जाणार

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचा दाखल देखील दिली. चिंबलकरांसाठी उपोषणाला बसलेल्या सांताक्रुझच्या माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस (मामी) यांची काँग्रेसने फसवणूक केली. पुत्र रुडॉल्फ फर्नांडिस भाजपात दाखल होऊन त्यांनी काँग्रेसची तशीच फसवणूक केल्याचा आरोपही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com