किटल बेतूल पठारावर एरो स्पोर्ट्स प्रकल्पाला मान्यता; पंचायत, आमदारांना विश्वासात न घेतल्याने स्थानिकांमध्ये शंकेचे वातावरण

Quitol Betul plateau aero sports project : औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेल्या किटल बेतूल पठारावर आता मे. स्कायडायविंग एडवेंचर्स या कंपनीला एरो स्पोर्ट्स प्रकल्प उभारण्याची परवानगी दिल्याने स्थानिकांमध्ये शंकेचे वातावरण तयार झाले.
Quitol Betul plateau aero sports project
Quitol Betul plateau aero sports projectDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: औद्योगिक वसाहत उभारण्याच्या इराद्याने १५ वर्षांपूर्वी औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केलेल्या किटल बेतूल पठारावर आता मे. स्कायडायविंग एडवेंचर्स या कंपनीला एरो स्पोर्ट्स प्रकल्प उभारण्याची परवानगी दिल्याने स्थानिकांमध्ये शंकेचे वातावरण तयार झाले आहे. हा निर्णय घेताना स्थानिक पंचायत तसेच स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्टा यांना पूर्णतः अंधारात ठेवण्यात आल्याने लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डच्या हल्लीच झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. २.४५ लाख चौरस मीटर जागेत हा प्रकल्प येत आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर पाच वर्षांच्या काळात एकूण ३०३ जणांना रोजगार प्राप्त होणार त्यापैकी ६१ टक्के म्हणजे १८३ नोकऱ्या स्थानिकांना तर ११८ नोकऱ्या बिगर गोमंतकीयांसाठी ठेवण्यात येणार असल्याचे या प्रकल्पाच्या अहवालात म्हटले आहे.

Quitol Betul plateau aero sports project
Goa Crime: रेल्वे प्रवासात महिलेला लुबाडले; अखेर गुन्हा नोंद, 4.51 लाखांचा ऐवज केला होता लंपास

या संदर्भात स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्टा यांना विचारले असता, प्रकल्पासंदर्भात मला किंवा स्थानिक पंचायतीला काहीच माहिती नाही. या प्रकल्पाचे स्वरूप काय आहे तेही मला माहीत नाही असे ते म्हणाले. या प्रकल्पाचे नेमके स्वरूप समजून घेण्यासाठी मी पंचायत सदस्यांसह मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहे.

Quitol Betul plateau aero sports project
Bengaluru to Goa Vande Bharat: प्रवास सुखकर होणार! बंगळुरू ते गोवा आता फक्त 13 तासांत; रेल्वे मंत्रालयाकडून 'वंदे भारत एक्स्प्रेस'चा प्रस्ताव

हा प्रकल्प चांगला असेल आणि स्थानिकांच्या फायद्याचा असेल तर तो सुरू होण्यास आमची काही हरकत नाही. मात्र, त्याचा फायदा केपे मतदारसंघाला होणार नसेल तर आमचा या प्रकल्पाला विरोध असेल, असेही डिकॉस्टा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com