Qupem News : जीव गेला तरी बेहत्तर पण कावरेत खाण सुरू करू देणार नाहीत; ग्रामस्थांचा निर्धार

मंगळवारी होणाऱ्या जन सुनावणी वेळी विरोध करण्याचा निश्चय
Qupem News
Qupem NewsDainik Gomantak
Published on
Updated on

कावरे येथील देवापान्न डोंगरावर प्रस्तावित मेंगनिज खनिज खाणीला कावरे गावातील लोकांनी आपला तीव्र विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत सदर खाण सुरू होऊ देणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. जीव गेला तरी बेहत्तर पण कावरेत खाण सुरू करू देणार नाहीत असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कावरे गावातिल देवापान्न डोंगरावर खनिज खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कावरे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून लोकांना विश्वासात न घेता खाणीचे सीमांकान केल्याचे लोकांनी सांगितले.

Qupem News
Job Fair In Goa: गोमन्तकीय तरूणांनो जॉब शोधताय? लागा तयारीला! फ्रेशर, अनुभवी उमेदवारांसाठी सरकारी जॉब फेअर, वाचा सविस्तर

11 रोजी यासंदर्भात जनसुनावणी होणार असून त्यावेळी या खाणीच्या विरोधात आम्ही जाणार असून कोणत्याही परिस्थितीत ही खाण सुरू होऊ देणार नसल्याचे सत्यवती वेळीप महिलेने सांगितले.

सदर डोंगर माथ्यावर आमच्या काजू बागायती असून खाली शेतजमीन आहे. हेच आमचे उपजीविकेचे साधन आहे. खाण सुरू झाल्यास आमचे जीवन उध्वस्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देवापान्न डोंगरावर कावरे गावातील लोकांच्या काजू असून सदर जमीन वनक्षेत्रात येत असल्याने किमान 175 लोकांनी वन अधिकार कायद्याखाली जमिनीसाठी अर्ज केले आहेत असे सतीश वेळीप यांनी सांगितले.

Qupem News
Goa Accident : ब्रम्हाकरमळीतील अरुंद रस्त्यामुळे कारचा अपघात; अल्पवयीन मुलगी जखमी

कावरे गावात खनिज खाणी मुळे लोकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. त्यात आणखी खाणी सुरू झाल्यास आम्हाला घरदार सोडून पळून जाण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर डोंगर माथ्याच्या खाली आमचे जागृत देवस्थान तसेच 'पायका झर' असून या झरीच्या पाण्यावर आम्ही अवलंबून आहेत.

जर खाण सुरू झाल्यास पाण्याचा स्रोत नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात भात शेती तसेच आता भाजी, मिर्चीची लागवड केली जाते असे रती वेळीप या महिलेने सांगितले.

सदर खाणीविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव संमत केला असून आता 11 रोजी जनसुनावणी होणार असून या विराधात काही लोक उच्च न्यायालयात गेले आहेत. कावरे गावात या खाणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत खाण सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार लोकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com