Job Fair In Goa: गोमन्तकीय तरूणांनो जॉब शोधताय? लागा तयारीला! फ्रेशर, अनुभवी उमेदवारांसाठी सरकारी जॉब फेअर, वाचा सविस्तर

नोकरी शोधणाऱ्या गोमन्तकीय तरूणांना या जॉब फेअरच्या माध्यमातून उत्तम नोकरी मिळवण्याची संधी आहे.
NSDC Job Fair In Goa
NSDC Job Fair In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

NSDC Job Fair In Goa: राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने गोव्यात आंतरराष्ट्रीय कौशल महोत्सव जॉब फेअर आयोजित केला जाणार आहे. या जॉब फेअरमध्ये फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी सुरू झाली आहे.

नोकरी शोधणाऱ्या गोमन्तकीय तरूणांना या जॉब फेअरच्या माध्यमातून उत्तम नोकरी मिळवण्याची संधी आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या वतीने विविध राज्यात जॉब फेअर आयोजित केले जातात. यावेळी 09 एप्रिल रोजी गोव्यात जॉब फेअर आयोजन केले जाणार असून, यासाठी मोफत नोंदणी सुरू झाली आहे. विविध क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांना यासाठी 09 एप्रिलपर्यंत नोंदणी करता येईल. महामंडळाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

NSDC Job Fair In Goa
Raigad: पोटासाठी येत होता गोव्याला... भूक लागली म्हणून खाली उतरला, रायगडमध्ये घडले असे की जीव गमावला

अशी करता येईल जॉब फेअरसाठी नोंदणी

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या (NSDC) (kaushalmahotsav.nsdcdigital.org) या संकेतस्थळावर जॉब फेअरसाठी मोफत नोंदणी करता येईल. उमेदवारांना 09 एप्रिलपर्यंत नोंदणी करता येईल. जॉब फेअरमध्ये कोणत्या क्षेत्रातील नोकरासाठी संधी असेल याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

नोंदणीसाठी ई-मेल पत्ता, शालेय माहिती, मागील कामाचा अनुभव व त्याची माहिती आणि उमेदवाराला स्वत:ची माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com